बॉलिवूडमध्ये असे काही कुटुंब आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. आज त्या कुटुंबियांना कोणत्या ओळखीची गरज नाही. कुटुंब कायम त्यांच्या संपत्ती आणि रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असतं. आता देखील अशाच एका कुटुंबाची चर्चा रंगत आहे जे प्रचंड श्रीमंत आहे. कुटुंबातील एक मुलागत महिन्याला कोट्यवधींचा माया कमावतो. हे कुटुंब दुसरं तिसरं कोणी नाहीतर, खान कुटुंब आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय लेखक सलीम खान यांच्यानंतर अभिनेता सलमान खान याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. खान कुटुंबाची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.
खान कुटुंबाच्या संपत्तीच्या पन्नास टक्के मालमत्तेचा सलमान खान एकटा मालक आहे. रिपोर्टनुसार, सलमान खानची एकूण संपत्ती 2000 कोटी रुपये आहे. एकूण संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर भाईजान याच्याकडे 2916 कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, खान कुटुंबाकडे 5259 कोटी रुपये आहेत.
रिपोर्टनुसार, दोघांच्या मालमत्तेसह त्यांची एकूण संपत्ती 900 कोटी रुपये आहे. यामध्ये अरबाज खानची एकूण संपत्ती 500 कोटी रुपये आहे. सोहेल खानची एकूण संपत्ती 333 कोटी रुपये आहे. वडील सलीम खानही या दोघांपेक्षा पुढे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1000 कोटी रुपये आहे. नेटवर्थच्या बाबतीत सलमान खानचे दोन भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान त्याच्यापेक्षा खूप मागे आहेत.
अभिनेता सलमान वयाच्या 58 व्या वर्षी देखील अविवाहित आहे. त्यांमुळे त्याच्या संपत्तीची वाटणी कोणामध्ये होणार? या चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान याच्या संपत्तीची वाटणी चार कुटुंबामध्ये होणार आहे.
सलमान खान याच्या संपत्तीची वाटणी अरबाज खान, सोहेल खान, बहीण अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान यांच्यामध्ये होणार आहे. एवढंच नाहीतर, संपत्तीमधील काही भाग अभिनेता एनजीओ बिईंग ह्युमनला देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सलमान खान याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता भाईजान ‘सिकंदर’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.