बॉलिवूडमध्ये असे अनेक कुटुंब आहेत, जे गडगंज श्रीमंत आहेत. त्यामध्ये खान, बच्चन, कपूर… या कुटुंबांचं नाव अव्वल स्थानी आहे. पण झगमगत्या विश्वात असं देखील एक कुटुंब आहे, जे खान, बच्चन, कपूर कुटुंबापेक्षा देखील कित्येक पटीने श्रीमंत आहे. सध्या ज्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे, त्या कुटुंबात कोणीच सुपरस्टार नाही. तरी देखील कुटुंब कमाईमध्ये अनेक बॉलिवूडच्या लोकप्रिय कुटुंबाच्या पुढे आहे. सध्या ज्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे, ते कुटुंब दुसरं तिसरं कोणतं नाही तर, कुमार कुटुंब आहे.
कुमार कुटुंबाची नेटवर्थ जळपास 10,000 कोटी आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार टी-सीरीज कंपनीचे मालक आहे. Hurun India रिच लिस्ट 2022 च्या माहितीनुसार, कुमार कुटुंबाची नेटवर्थ 1.2 बिलियन डॉलर म्हणजे 10,000 कोटी रुपये आहे. टी-सीरीज एक प्रॉडक्शन आणि म्यूजिक कंपनी आहे. टी-सीरीज लोकप्रिय आणि प्रसिद्ध कंपनी आहे.
T-Series चं जगातील दुसरे सर्वाधिक सबस्क्राइब केलेले YouTube चॅनल आहे. 200 श्रीमंत भारतीयांच्या यादीत हे कुटुंब आहे. कुटुंबातील उर्वरित सदस्य, अभिनेत्री दिव्या खोसला, अभिनेत्री खुशाली कुमार आणि गायिका तुलसी कुमार, गायिका तान्या सिंग देखील इंडस्ट्रीत सक्रिय आहेत.
T-Series कंपनीबद्दल सांगायचं झालं तर, गुलशन कुमार यांनी 1983 मध्ये T-Series कंपनीची स्थापना केली. आता T-Series कंपनीचा मालकी हक्क भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या खांद्यावर आहे. भूषण कुमार यांनी पत्नी दिव्या खोसला अभिनय विश्वात सक्रिय आहे. पण अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःच्या भक्कम स्थान निर्माण करु शकली नाही.
गुलशन कुमार यांचे भाऊ कृष्ण यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी देखील अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. पण बॉलिवूडमध्ये त्यांना यश मिळालं आहे. आता देखील कृष्ण कुमार यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. कृष्ण कुमार यांची एकुलत्या एक लेक टिशा हिने वयाच्या 21 व्या अखेरचा श्वास घेतला आहे.
अभिनेते आणि निर्माते कृष्ण कुमार यांची 21 वर्षीय मुलगी टिशा कुमारचं 18 जुलै रोजी निधन झालं. टिशाला कर्करोगाचं निदान झालं होतं आणि उपचारासाठी कुटुंबीयांनी तिला जर्मनीला न्यायचं ठरवलं होतं. जर्मनीत उपचारादरम्यान तिचं निधन झालं. टिशा हिच्या निधनानंतर कुटुंबाला फार मोठा धक्का बसला आहे.