मुंबई: एकापेक्षा एक खतरनाक स्टंट्स करत कोरिओग्राफर तुषार कालियाने ‘खतरों के खिलाडी 12’चं (Khatron Ke Khiladi 12) विजेतेपद पटकावलं आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने (Rohit Shetty) या शोचं सूत्रसंचालन केलं होतं. जुलैपासून हा शो सुरू झाला होता. त्याचा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत (Grand Finale) पोहोचले होते. त्यामध्ये तुषार कालिया, जन्नत जुबैर, मोहित मलिक, फैजल शेख आणि रुबिना दिलैक यांचा समावेश होता. या पाच स्पर्धकांपैकी तुषार आणि फैजलमध्ये अंतिम सामना झाला. या शेवटच्या स्टंटमध्ये तुषारने फैजलला मात देत ‘खतरों के खिलाडी 12’ची ट्रॉफी आपल्या नावे केली.
खतरों के खिलाडीच्या ट्रॉफीसोबतच तुषारला 20 लाख रुपयांचा चेक बक्षिस म्हणून मिळाला. याशिवाय एक कारसुद्धा त्याला भेट म्हणून मिळाली. या शोच्या टॉप सहा स्पर्धकांमध्ये कनिका मानचाही समावेश होता. मात्र ग्रँड फिनालेपूर्वी तिला बाहेर पडावं लागलं.
ग्रँड फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी कनिका आणि जन्नत यांची एकमेकांसमोर टक्कर होती. या दोघींना जमिनीपासून उंचावर एका लाकडाच्या प्लॅटफॉर्मवर हातात दांडी घेऊन चालायचं होतं. विजेचा करंट लागणाऱ्या तारेपासून वाचत त्यांना पुढे चालायचं होतं.
या दोघींनी हा टास्क पूर्ण केला, मात्र जन्नतने कनिकापेक्षा कमी वेळ घेऊन हा टास्क पूर्ण केला होता. त्यामुळे जन्नत फिनालेपर्यंत पोहोचू शकली होती.
खतरों के खिलाडीच्या आतापर्यंतच्या 12 सिझन्सपैकी 3 सिझनमध्ये कोरिओग्राफच विजेते ठरले होते. तुषार कालियाच्या आधी शांतनू महेश्वरी आणि पुनीत पाठकने विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे कोरिओग्राफर आणि या शोचं खास कनेक्शन आहे, असं म्हटलं जातं.
#KKK12 the hilarious #NishantBhat#RajivAdatia #KanikaMann #TusharKalia #JannatZubair #RubinaDilaik #MohitMalik #FaisalSheikh pic.twitter.com/tlS2luoSGI
— Mitha Adriani (@Mitha241201) September 25, 2022
बाराव्या सिझनमध्ये मोहित मलिक, रुबिना दिलैक, फैजल शेख, जन्नत जुबैर, तुषार कालिया यांच्यासोबतच शिवांगी जोशी, प्रतिक सेहजपाल, निशांत भट्ट, एरिका फर्नांडिस, चेतना पांडे, अनेरी वजनी, श्रीती झा, कनिका मान, राजीव अडातिया यांनी भाग घेतला होता.