मुंबई : ‘बिग बॉस 16’ शोनंतर प्रसिद्धीझोतात आलेला शिव ठाकरे आता गगन भरारी घेताना दिसत आहे. बिग बॉसमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर शिव आता ‘खतरों के खिलाडी’मध्ये भयानक स्टन्ट करण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या सर्वत्र शिव याची चर्चा रंगत आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ‘खतरों के खिलाडी’ या शोच्या माध्यमातून शिव चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘बिग बॉस 16’च्या घरात सर्वांना समजून घेणारा शिव आता वेगळ्या रुपात चाहत्यांना अनुभवता येणार आहे. ‘बिग बॉस 16’ नंतर ‘खतरों के खिलाडी’ शोमध्ये शिवला पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र शिव ठाकरे याचीच चर्चा रंगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी १३’ सीझनचा पहिला स्पर्धक असणार आहे.
‘खतरों के खिलाडी’मध्ये झळकल्यानंतर शिवच्या मानधनात देखील मोठी वाढ होणार असल्याची चर्चा रंगत आहे. शिव ‘खतरों के खिलाडी’ शोच्या यदांच्या भागातून मोठी कमाई करणार आहे. शोमध्ये शिवा याची फी काय असेल, हे कळालेलं नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार शोमध्ये शिव हाईएस्ट पेड अभिनेता असणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शोच्या एका एपिसोडसाठी शिव ठाकरे लाखो रुपये घेणार आहे.
रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ शोसाठी शिव सज्ज झाला आहे. रिपोर्टनुसार, ‘खतरों के खिलाडी’च्या एका एपिसोडसाठी शिव जवळपास ५ ते ८ लाख रुपये घेणार आहे. म्हणजे अभिनेता एका आठवड्यासाठी जवळपास १० ते १६ कोटी रुपये मानधन घेईल. अशी चर्चा रंगत आहे.
खतरों के खिलाडी या शोमध्ये आणखी अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली होती, त्यापैकी दोन टीव्ही सेलिब्रिटींची नावे फायनल झाली आहेत. कुंडली भाग्य फेम अभिनेत्री अंजुम फकीह आणि रुही चतुर्वेदी शोमध्ये धोकादायक स्टन्ट करताना दिसणार आहेत.
शिव म्हणाला, ‘जे व्हायचं होतं ते झालं… ट्रॉफी माझ्या मंडळीतील एमसी स्टॅन घेवून गेला. त्यामुळे मी प्रचंड आनंदी आहे. शिवाय शेवटच्या दिवसापर्यंत विजयी होण्यासाठी मी प्रयत्न केलं. जी गोष्ट मी मनापासून केली, ती मला भेटली आहे. अनेकांनी माझं कौतुक केलं, मला पाठिंबा दिला… लोकांचं प्रेम घेवून मी बाहेर निघालो आहे..’ (MC Stan lifestyle)
पुढे शिव म्हणाला, ‘काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण काही गोष्टी आपल्या उज्वल भविष्यासाठी होत असतात. कारण आपल्या मनात जी जिंकण्याची भूक असते ती अधिक तिव्र होते आणि विजयाची भूक आता माझी वाढली आहे. पुढचा दरवाजा वाट पाहत आहे. जे काही करेल ते मेहनतीने आणि जिद्दीने करेल… कायम माझ्या जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात राहिल…’ असं देखील शिव ठाकरे म्हणाला.