मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सतत खतरों के खिलाडी 13 चर्चेत आहेत. शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अर्चना गाैतम हे खतरों के खिलाडी 13 मध्ये सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे प्रियांका चाैधरी, शालिन भनोट आणि अब्दू रोजिक हे देखील खतरों के खिलाडी 13 (Khatron Ke Khiladi 13) मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच शालिन भनोट याने जाहिर केलेली की तो खतरों के खिलाडी 13 मध्ये सहभागी होणार नाहीये. कारण ज्याप्रकारचे स्टंट (Stunt) खतरों के खिलाडीमध्ये केले जातात ते आपण करू नाही शकत म्हणताना देखील शालिन दिसला. प्रियांका चाैधरी हिला देखील खतरों के खिलाडी 13 ची आॅफर होती. मात्र, प्रियांकाने स्पष्ट केले की, आता तिला अभिनयाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे.
नुकताच साऊथ आफ्रिकेमध्ये खतरों के खिलाडी 13 ची शूटिंग सुरू करण्यात आलीये. खतरों के खिलाडी 13 मध्ये एकून 14 स्पर्धेक हे सहभागी झाले आहेत. सहभागी झालेले स्पर्धेक हे सोशल मीडियावर काही मजेदार व्हिडीओ आणि फोटो देखील शेअर करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त असलेले नाव शीजान खान हा देखील खतरों के खिलाडी 13 मध्ये सहभागी झालाय.
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. इतकेच काय तर तो बरेच दिवस जेलमध्ये देखील होता. शीजान खान याला खतरों के खिलाडी 13 मध्ये सहभागी केले जाऊ नये, या करिता तुनिशा शर्मा हिच्या आईने निर्मात्यांना एक नोटीस देखील पाठवली होती. मात्र, आता शीजान खान हा खतरों के खिलाडी 13 मध्ये सहभागी झालाय.
नुकताच रोहित शेट्टी याने खतरों के खिलाडी 13 मधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी सर्वकाही नवीन असणार आहे. रोहित शेट्टी याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या हाताला मोठा मार लागल्याचे दिसत आहे. रोहित शेट्टी याच्या हाताला दुखापत झालीये. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे दिसत आहे.
रोहित शेट्टी याने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. रोहित शेट्टी याच्या हाताला नेमके काय झाले हे अजून कळू शकले नाहीये. रोहित शेट्टी याची दुखापत पाहून चाहते चिंतेमध्ये आल्याचे देखील देखील आहेत. शिव ठाकरे हा खतरों के खिलाडी 13 मध्ये काय धमाका करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.