मुंबई : बोनी कपूर यांची छोटी लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिची बहीण खुशी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच खुशी कपूर हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. विशेष म्हणजे शाहरूख खान याची लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर यांनी एकाच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. गेल्या काही दिवसांपासून खुशी कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. विशेष म्हणजे खुशी कपूर आपल्या चाहत्यांसाठी सतत खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसतंय.
आर्चीज चित्रपटामधून खुशी कपूर हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. हा चित्रपट 7 डिसेंबर 2023 रोजी रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला अजिबातच धमाका करण्यात यश मिळाले नाही. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले. नुकताच आता खुशी कपूर ही कॉफी विथ करण या शोमध्ये पोहचली. यावेळी धमाका करताना खुशी दिसली.
करण जोहर याने म्हटले की, खुशी तू वेदांग रैना याला डेट करत असल्याची एक चर्चा आहे. यावेळी करण जोहर याला धमाकेदार उत्तर देताना खुशी कपूर ही दिसली आहे. विशेष म्हणजे खुशी कपूर हिची हे उत्तर ऐकून सर्वजण हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले. अत्यंत खास स्टाईलने उत्तर देताना खुशी कपूर ही दिसली आहे.
खुशी म्हणाली की, ओम शांती ओमचा तो सीन तुम्हाला माहीत आहे का जिथे लोक फक्त ओम आणि मी फक्त चांगले मित्र होतो असे म्हणत होते?” खुशीचे हे बोलणे ऐकून सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले. आता हाच प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. करण जोहर याच्या या शोमध्ये अनेक कलाकार येताना दिसत आहेत.
द आर्चीज चित्रपटानंतर एक चर्चा सतत रंगताना दिसत आहे की, खुशी कपूर आणि वेदांग रैना हे एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, यावर दोघांपैकी कोणीही काहीही भाष्य केले नाहीये. अनेकदा खुशी कपूर आणि वेदांग रैना हे एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. रिपोर्टनुसार वेदांग रैना आणि खुशी कपूर एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, याबद्दल अजून काही खुलासा हा होऊ शकला नाहीये.