किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा इतक्या वर्षांनंतर करणार असं काम? चर्चांना उधाण

| Updated on: May 20, 2024 | 2:14 PM

Kiara Advani and Siddharth Malhotra : किआरा अडवाणी - सिद्धार्थ मल्होत्रा यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर घेतला लग्नाचा निर्णय... आता लग्नानंतर पुन्हा दोघं करणार असं कामं? चाहत्यांची उत्सुकता देखील पोहोचली शिगेला... सर्वत्र चर्चांना उधाण...

किआरा अडवाणी - सिद्धार्थ मल्होत्रा इतक्या वर्षांनंतर करणार असं काम? चर्चांना उधाण
Follow us on

अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. 7 फेब्रुवारी रोजी अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांनी लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ – किआरा विवाहबंधनात अडकले. सध्या किआरा एका मोठ्या काणारणामुळे चर्चेत आली आहे. कान फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये अभिनेत्रीने प्रथमच भारताचं प्रतिनिधित्व केलं. एवढंच नाहीतर, अभिनेत्रीने आगामी सिनेमांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.

दरम्यान, मुलाखतीत अभिनेत्रीने पती आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याबद्दल सांगितले दोघांचा प्लॅन काय आहे? याबद्दल देखील सांगितलं. ‘शेरशाह’ सिनेमानंतर चाहत्यांनी पुन्हा दोघांना एकत्र पाहाण्याची इच्छा व्यक्त केली.

यावर अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. ”शेरशाह’ सिनेमामुळे आमच्या दोघांवर प्रेमाचा वर्षाव झाला. म्हणून चाहत्यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर आम्हाला एकत्र पाहायचं आहे. मी त्याबद्दल कधीच विचार केला नव्हता की, एक कपल म्हणून केलेलं काम चाहत्यांना आवडेल. त्यामुळे पुन्हा एकत्र काम करण्याची आम्ही संधी शोधत असतो.’

हे सुद्धा वाचा

दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नातं कधीही समोर आलं नाही. पण जेव्हा ‘शेरशाह’ सिनेमातून दोघे प्रेक्षकांच्या भोटीस आले, तेव्हा चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘शेरशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चहत्यांना प्रचंड आवडली.

किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा यांनी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. सोशल मीडियावर देखील त्यांच्या कामाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. अभिनेत्री स्वतः सिद्धार्थसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

किआरा अडवाणी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.