Sidharth Kiara Wedding : जवळपास ४ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) लग्न करण्याचा निर्णय घेतला. किआरा – सिद्धार्थ ७ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. आता दोघांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही अंदाजात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. आता किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नापूर्वीच्या विधी मोठ्या थाटात पार पडत आहेत. सर्वत्र सिद्धार्थ – किआरा यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. किआराच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी लागली आहे. दोघे काही तासांत आता लग्नबंधनात अडकणार आहेत.
सिद्धार्थ – किआरा यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना, संगीत सोहळ्यापूर्वी सिद्धार्थ – किआरा एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहेत. सध्या त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघे डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये किआरा शिमरी लेहेंग्यामध्ये दिसत असून सिद्धार्थ काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सिद्धार्थ मल्होत्रच्या फॅनपेजवरुन पोस्ट करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र सिद्धार्थ – किआराच्या डान्सची चर्चा रंगत आहे.
Memory lane: When groom to be @SidMalhotra and bride to be @advani_kiara were grooving together on dance floor #SidharthKiaraWedding #SidKiaraWedding #SidKiaraKiShaadi #SidKiara #SidharthMalhotra #KiaraAdvani pic.twitter.com/FGlW7WZiPU
— Sidharth Malhotra FC (@SidharthFC_) February 5, 2023
सर्वत्र किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगत असताना सेलिब्रिटी कार्ड रिडर दिव्या पंडित यांनी दोघांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल भविष्यवाणी केली आहे. मिळालेल्या माहितीनूसार दिव्या पंडित यांनी किआरा – सिद्धार्थ यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगितलं आहे. लग्नानंतर दोन वर्षात दोघे आई – वडील होतील शिवाय लग्नाानंतर दोघांचा प्रॉडक्शन हाऊस असले असं देखील दिव्या पंडित यांनी सांगितलं आहे.
किआरा – सिद्धार्थ याचं लग्नानंतर रिसेप्शन
मेहंदी, हळदी, लग्न… यासर्व विधींनंतर किआरा – सिद्धार्थ एक नाही तर दोन वेळा रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत. लग्नानंतर किआरा – सिद्धार्थ याचं एक रिसेप्शन मुंबई याठिकाणी होणार आहे तर दुसरं रिसेप्शन दिल्ली येथे होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार किआरा – सिद्धार्थ १२ फेब्रुवारी रोजी रिसेप्शनसाठी पाहुण्यानं निमंत्रण पाठवणार आहेत. याआधी प्रियांका चोप्रा – निक जोनास, दीपिका पादुकोण – रणवीर सिंग यांनी देखील लग्नानंतर भव्य रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, किआरा – सिद्धार्थ यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण रिलेशनशिपमध्ये असताना दोघांनी कधीही त्यांचं नातं सर्वांसमोर कबूल केलं नाही. ‘शेहशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमा हीट झाल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरदार रंगल्या.