kiara advani sidharth malhotra wedding : अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या. सध्या सर्वत्र सिद्धार्थ – किआरा यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत. रिलेशनशिपमध्ये असताना सिद्धार्थ – किआरा यांनी कधीही त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही. शिवाय लग्नाच्या तारखेबद्दल देखील कोणतीही घोषणा केली नाही. लग्न झाल्यानंतर अखेर दोघांनी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट नात्याची कबुली दिली.
लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता सिद्धार्थ – किआराच्या लग्नाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. शुक्रवारी एक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये सिद्धार्थ – किआरा एकमेकांना वरमाला घालताना दिसले. आता त्यांच्या संगीत सोहळ्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. आता व्हायरल होत असलेला व्हिडीओ अभिनेत्रीचा भाऊ मिशाल आडवाणी याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (kiara advani wedding video)
व्हिडीओमध्ये मिशाल, सिद्धार्थ – किआरा यांच्यासाठी गाणं गाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सिद्धार्थ – किआरा यांच्या संगीत सोहळ्याची एक झलक दिसत आहे. ज्यामध्ये किआरा हिच्या भाऊ आणि बहिणीने एक खास परफॉर्मेंस दिला. सध्या सर्वत्र सिद्धार्थ – किआरा यांच्या लग्नाच्या फोटोंची आणि व्हिडीओंची चर्चा रंगत आहे. (kiara advani sidharth malhotra )
मिशाल याच्या व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. खुद्द किआरा हिने देखील भावाच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट केली आहे. किआराने भावाच्या व्हिडीओवर लाला रंगाचा इमोजी पोस्ट केला आहे. सध्या मिशाल याचा व्हिडीओ चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.
किआरा आणि सिद्धार्थ यांनी लग्नात ‘नो फोटो पॉलिसी’ निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे लग्नादरम्यान दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले नाहीत. अखेर लग्न झाल्यानंतर किआरा आणि सिद्धार्थ यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले आणि चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. (kiara advani bother video)
किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नातं कधीही समोर आलं नाही. पण जेव्हा ‘शेरशाह’ सिनेमातून दोघे प्रेक्षकांच्या भोटीस आले, तेव्हा चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘शेरशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चहत्यांना प्रचंड आवडली. (kiara advani and sidharth malhotra relationship)