Siddharth Kiara Wedding : प्रत्येक आई – वडिलांसाठी लेकीचं लग्न फार खास असतं. पण जेव्हा लेक लग्न करुन आई – वडिलांचं घर सोडून सासरी जाते, तेव्हा सर्वांत जास्त दुःख आई – वडिलांना होतं. वडील आणि लेकीचं नातं फार खास असतं. लेकीच्या लग्नात सर्वांसमोर हसत असलेला बाबा मनातून रडत असतो. आता अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) देखील अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) याच्या सोबत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. किआरा – सिद्धार्थ राजस्थान मधील सूर्यगढ पॅलेसमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नासाठी किआरा – सिद्धार्थ यांचे कुटुंबिय आणि मित्र परिवार विवाहस्थळी पोहोचले आहे. याचदरम्यान किआरा हिचे वडील विमानतळावर समोर आले आणि भावना व्यक्त केल्या.
लेकीच्या लग्नासाठी जाताना जेव्हा किआराच्या वडिलांना विमानतळावर स्पॉट करण्यात आलं, तेव्हा त्यांनी भावना व्यक्त केल्या. किआराचे वडील लेकीच्या लग्नापूर्वी भावना व्यक्त करत म्हणाले, ‘दोघांना शुभेच्छा आणि भविष्यासाठी ऑल द बेस्ट….’ सध्या किआराच्या वडिलांचा व्हिडीओ सोशल मीजियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नासाठी किआरा आणि सिद्धार्थ देखील विवाहस्थळी पोहोचले आहेत. सध्या सर्वत्र दोघांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. (kiara advani sidharth malhotra wedding)
अनेक वर्ष डेट केल्यानंतर किआरा – सिद्धार्थ लवकरच विवाबहबंधनात अडकणार आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही अंदाजात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. दोघांच्या लग्नाची तयारी सध्या मोठ्या उत्साह सुरु आहे. त्यांच्या लग्नात कुटुंब आणि मित्र परिवार उपस्थित राहणार आहेत. ६ फेब्रुवारी रोजी किआरा – सिद्धार्थ यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. ४ आणि ५ तारखेला लग्नाच्या आधीच्या विधी पार पडणार आहेत.
लग्नाबद्दल रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नात खास सुरक्षेचा बंदोबस्त करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नाच्या सुरक्षेची जबाबदारी ही शाहरुख खानच्या एक्स-बॉडीगार्ड यासीन युगल याच्याकडे सोपवण्यात आली आहे. (sidharth malhotra kiara advani wedding festivities)
महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सेलेब्रेटी मेहंदी आर्टिस्ट वीना नागदा यांचे फोटो समोर आल्यानंतर किआरा – सिद्धार्थ विवाहबंधनात अडकणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली. आता लवकरच किआरा – सिद्धार्थ पती – पत्नीच्या रुपात चाहत्यांच्या समोर येणार आहे. किआरा – सिद्धार्थ यांना पती – पत्नीच्या रुपात पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे.