Kiara Advani 6 फेब्रुवारी रोजी अडकणार विवाहबंधनात? असा प्रश्न विचारताच अभिनेत्रीची प्रतिक्रिया

| Updated on: Jan 18, 2023 | 10:55 AM

आलिया भट्ट - रणबीर कपूर यांच्यानंतर किआरा - सिद्धार्थ अडकणार विवाहबंधनात ? लग्नाबद्दल प्रश्न विचारताच अभिनेत्रीची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद, व्हायरल व्हिडीओची सर्वत्र चर्चा

Kiara Advani 6 फेब्रुवारी रोजी अडकणार विवाहबंधनात? असा प्रश्न विचारताच अभिनेत्रीची प्रतिक्रिया
Kiara Advani 6 फेब्रुवारी रोजी अडकणार विवाहबंधनात? असा प्रश्न विचारताच अभिनेत्रीची प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : अभिनेत्री किआरा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. ‘शेरशाहा’ सिनेमातील सिद्धार्थ – किआरा यांची केमिस्ट्री पाहिल्यानंतर चाहत्यांनी बॉलिवूडच्या नव्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘शेरशाहा’ सिनेमाच्या यशानंतर सिद्धार्थ – किआरा यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. मध्यंतरी अनेकदा दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला. रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं अखेर समोर आलं. दरम्यान दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

महत्त्वाचं म्हणजे, सिद्धार्थ – किआरा दोघांनी नवं वर्षाचं स्वागत देखील एकत्र केलं. गेल्या काही दिवसांपासून किआरा सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ‘मिशन मजनू’ सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी पोहोचली होती. यावेळी किआरा फार सुंदर दिसत होती. किआरा पाहिल्यानंतर फोटोग्राफर्सने अभिनेत्रीला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गर्दी केली.

 

 

तेव्हा फोटोग्राफर्सने ६ फेब्रुवारी तारीखेचा उल्लेख करत किआराला प्रश्न विचारले. तेव्हा किआरा प्रश्न ऐकून हासू लागली. पण अभिनेत्रीने लग्नाबद्दल काहीही सांगितलं नाही. त्यामुळे लग्नाची तारीख समोर आल्यानंतर किआरा – सिद्धार्थ त्यांचं नातं सर्वांसमोर कधी स्वीकारतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र किआराच्या नव्या व्हिडीओची चर्चा आहे.

सिद्धार्थ आणि किआराबद्दल सांगायचं झालं तर, दोघे लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सिद्धार्थ आणि किआरा कधी विवाहबंधनात अडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

लग्नाच्या चर्चा रंगत असताना, नुकताच सिद्धार्थने स्वतःचा ३८ वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी किआराने दोघांचा क्यूट फोटो शेअर करत सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फोटोमध्ये दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहात आहेत. सिद्धार्थ आणि किआराचे फोटो आणि व्हिडीओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.