Siddharth Kiara Wedding : बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. अनेक वर्ष डेट केल्यानंतर किआरा – सिद्धार्थ लवकरच विवाबहबंधनात अडकणार आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही अंदाजात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. दोघांच्या लग्नाची तयारी सध्या मोठ्या उत्साह सुरु आहे. त्यांच्या लग्नात कुटुंब आणि मित्र परिवार उपस्थित राहणार आहेत. ६ फेब्रुवारी रोजी किआरा – सिद्धार्थ यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. ४ आणि ५ तारखेला लग्नाच्या आधीच्या विधी पार पडणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत आसताना किआरा – सिद्धार्थ यांचं लग्न चाहचत्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहाता येणार असल्याची चर्चा रंगत आहे.
ॲमेझॉन प्राईमच्या एका पोस्टनंतर अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचं लग्न ओटीटीवर पाहता येवू शकतं. ॲमेझॉन प्राईमने सिद्धार्थ आणि किआरा यांचा ‘शेहशाहा’ सिनेमातील एक फोटो पोस्ट केला आहे. प्राईमने दोन फोटोंचा कोलाज केला आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ – किआरा आणि पॅलेसची एक झलक दिसत आहे. पण याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सिद्धार्थ आणि किआरा यांचं लग्न विरल भयानी कव्हर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पोर्ट्सनुसार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नाच्या सुरक्षेची जबाबदारी ही शाहरुख खानच्या एक्स-बॉडीगार्ड यासीन युगल याच्याकडे सोपवण्यात आली आहे. 3 फेब्रुवारी रोजी बॉडीगार्ड्स आणि सिक्युरिटी गार्ड्सची टीम रवाना होणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे, सेलेब्रेटी मेहंदी आर्टिस्ट वीना नागदा याचे फोटो समोर आल्यानंतर किआरा – सिद्धार्थ विवाहबंधनात अडकणार असल्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. वीना नागदा यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर कॅप्शनमध्ये ‘राजस्थान कॉलिंग’ असं लिहिलं आहे. वीना नागदा विमानतळावर उभ्या असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. सध्या त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी यांनी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकत्र आहेत. पण किआरा आणि सिद्धार्थ यांनी कधीही नात्याची कबुली दिली नाही. दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये देखील दोघांना नात्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा देखील दोघांनी नात्याबद्दल मौन बाळगलं. आता चाहत्यांना किआरा आणि सिद्धार्थ यांना पती-पत्नीच्या रुपात पाहण्याची इच्छा शिगेला पोहोचली आहे.