‘बाबा आजीसाठी रडत होते आणि ती अमानुष लोकं..’; किच्चा सुदीपची मुलगी कोणावर भडकली?

| Updated on: Oct 22, 2024 | 10:48 AM

किच्चा सुदीपच्या आईचं रविवारी निधन झालं. या निधनानंतर त्याच्या मुलीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित काही लोकांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आजीच्या अंत्यविधीदरम्यान घडलेला प्रकार तिने या पोस्टमध्ये सांगितला आहे.

बाबा आजीसाठी रडत होते आणि ती अमानुष लोकं..; किच्चा सुदीपची मुलगी कोणावर भडकली?
कन्नड अभिनेता किच्चा सुदीप
Image Credit source: Twitter
Follow us on

प्रसिद्ध कन्नड अभिनेता आणि ‘बिग बॉस कन्नड’चा सूत्रसंचालक किच्चा सुदीपने नुकतंच त्याच्या आईला गमावलं. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना बेंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या निधनानंतर किच्चा सुदीपच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र अशा कठीण काळातही माणुसकी न दाखवणाऱ्यांवर सुदीपची मुलगी भडकली आहे. किच्चा सुदीपची मुलगी सानवी सुदीपने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. रविवारी आजी सरोजा संजीव यांच्या निधनानंतर तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटलंय, ‘आजीला गमावणं हा माझ्या आजच्या दिवसातील सर्वांत वाईट भाग नव्हता तर ज्या लोकांनी याठिकाणी माझ्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर नाही केला.’

सानवीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आजी सरोजा यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला. या फोटोसोबत तिने लिहिलं, ‘मी तुझ्यावर नेहमी खूप प्रेम करेन.’ यानंतर आजीच्या अंत्यविधीदरम्यान नेमकं काय घडलं, याविषयी तिने पोस्टमध्ये संताप व्यक्त केला. ‘आजचा दिवस माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होता. पण माझ्या आजीला गमावणं हा आजच्या दिवसातील सर्वांत वाईट भाग नव्हता. तर लोक माझ्या घराबाहेर जमले होते, जोरजोराने शिट्ट्या वाजवत होते, माझ्या तोंडावर कॅमेरे धरत होते.. हा सर्वांत वाईट भाग होता. एखादी व्यक्ती अजून किती अमानुष वागू शकते मला माहीत नाही’, अशा शब्दांत तिने तीव्र नाराजी बोलून दाखवली.

हे सुद्धा वाचा

किच्चा सुदीपच्या मुलीची पोस्ट-

तिथे जमलेल्या लोकांमुळे ते आजीला शांतपणे शेवटचा निरोपसुद्धा देऊ शकले नाही, असं सान्वी या पोस्टमध्ये म्हणाली. पुढे तिने लिहिलं, ‘जेव्हा माझे वडील त्यांच्या आईसाठी रडत होते, तेव्हा तिथे काही लोक धक्काबुक्की करत होते आणि एकमेकांना ओढत-ढकलत होते. आजीला अखेरचा निरोप देताना आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. एकीकडे मी माझ्या प्रिय व्यक्तीला गमावल्याबद्दल रडत होते आणि दुसरीकडे ते सर्व लोक कोणत्या प्रकारची रील आपण सोशल मीडियावर पोस्ट करू शकतो याचा विचार करत होते.’

रविवारी सकाळी सरोजा यांचं निधन झालं. बेंगळुरूमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनानंतर त्यांचं पार्थिव किच्चा सुदीप यांच्या जेपी नगर इथल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलं होतं. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि खासदार बसवराज बोम्मई यांच्यासह कन्नड चित्रपटसृष्टीतील विविध सेलिब्रिटीसुद्धा तिथे उपस्थित होते.