‘भावा फक्त तूच राहिला होतास…’, दबक्या पावलांनी आलेल्या हरणीने ‘या’ प्रसिद्ध सिलेब्रिटीची केली शिकार, पाहा व्हिडीओ

| Updated on: Jun 06, 2023 | 9:37 AM

दबक्या पावलांनी आलेल्या हरणीची सर्वत्र चर्चा... 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीला नाही आवरला मोह... खास व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

भावा फक्त तूच राहिला होतास..., दबक्या पावलांनी आलेल्या हरणीने या प्रसिद्ध सिलेब्रिटीची केली शिकार, पाहा व्हिडीओ
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. एखादं गाणं किंवा एखाद्या सिनेमातील डायलॉगची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगते. पण सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे ‘दबक्या पावलांनी आली’ गाण्याची. या गाण्यावर अनेकांनी रील तयार करत सोशल मीडियावर अपलोड केलं. अनेकांच्या व्हिडीओला हजारोंनी लाईक्स आणि कमेंट आल्या. अनेक सेलिब्रिटींनी देखील गाण्यावर रील तयार केलं. पण परदेशात देखील मराठी गाण्याचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र एका सेलिब्रिटीची चर्चा रंगत आहे. हा सेलिब्रिटी दुसरा तिसरा कोणी नसून टांझानियाचा प्रसिद्ध सोशल मीडिया सेन्सेशन किली पॉल (Kili Paul) आहे.

किली पॉल कायम सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करत चर्चेत असतो. आता तर त्याने थेट मराठी गाण्यावर रील तयार केलं आहे. ‘दबक्या पावलांनी आली’ गाण्यासाठी रील तयार करताना किली पॉल आणि त्याच्या बहिणीने पारंपरिक लूक केला होता. सध्या सर्वत्र किली पॉल याच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेक नेटकऱ्यांना देखील किली पॉलाचा मराठी अंदाज आवडला आहे.

 

 

अनेकांनी किली पॉलच्या व्हिडीओ कमेंट करत आनंद व्यक्त केला. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘भावा फक्त तूच राहिला होतास…’, तर दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मराठी…’ तर अनेकांनी विविध इमोजी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय अनेकांनी किली पॉल (Kili Paul) च्या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

टांझानियाचा प्रसिद्ध सोशल मीडिया सेन्सेशन किली पॉल कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. किली पॉल बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरत त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. चाहते देखील किली पॉल याच्या प्रत्येक व्हिडीओला भरभरून प्रेम देतात. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय किली पॉल भारतात देखील आला होता.

किली पॉल (Kili Paul Instagram) हा इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. किली पॉल आणि त्याची बहिण निम कायम सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत असतात. दोघांच्या व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम देखील मिळतं.

किलीचे सोशल मीडियावर जवळपास 2.4 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. किली अनेकदा भारतात देखील आला आहे. बिग बॉसमध्ये देखील पाहुणा म्हणून उपस्थित राहिला होता. किली कायम चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतो.