आमिर खान याची एक्स पत्नी किरण राव ही चांगलीच चर्चेत आहे. आता आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाला काही वर्षे उलटली आहेत. मात्र, त्यांनी कधीच त्यांचा घटस्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला हे सांगितले नाही. आता इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच आमिर खान याच्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलताना किरण राव ही दिसली आहे. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण राव ही घटस्फोटाबद्दल बोलताना दिसलीये. यावेळी जरा स्पष्टच बोलताना किरण राव ही दिसली. आता किरण राव हिने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
किरण राव म्हणाली की, नक्कीच मी माझा संपूर्ण वेळ घेतला. यामुळेच मला काही काळजी नव्हती. मुळात म्हणजे मी आणि आमिर दोघेही खूप जास्त मजबूत आहोत, फक्त आम्हीच नाही तर आमचे नातेही तेवढेच मजबूत आहे. आम्ही एकमेकांशी खूप जास्त जोडले गेलेलो आहोत. आम्ही एकमेकांचा खूप आदर देखील करतो.
यामुळेच मला कोणत्याही गोष्टींची काळजी अजिबातच नव्हती. पुढे किरण राव म्हणाली की, मला एक स्पेस हवा होता. मला माझ्या पद्धतीने मुक्तपणे जीवन जगायचे होते. मला काही गोष्टींमध्ये स्वत:ची प्रगती करायची होती. हेच नाही तर आमिरने माझ्या निर्णय स्वीकारला आणि मला सपोर्ट देखील केला. आमिरने माझी खूप मदत केली.
यासर्व गोष्टींमुळे मला घटस्फोटाची अजिबातच भिती वाटली नाही. हेच नाही तर किरण राव हिने हा देखील खुलासा केला की, ती आणि आमिर खान लग्नाच्या अगोदर तब्बल 1 वर्ष लिव इनमध्ये राहत होते. पहिल्यांदाच आमिर खान याच्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल असे जाहिरपणे बोलताना किरण राव ही दिसत आहे.
आता किरण राव हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. किरण राव हिने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, मी आणि आमिर खान एकाच इमारतीमध्ये राहतो. हेच नाही तर आम्ही जेवणही एकत्र करतो. किरण राव आणि आमिर खान यांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, यांच्या घटस्फोटाचे कारण समजू शकले नव्हते.