KKBKKJ | पहिल्याच वीकेंडला सलमानच्या चित्रपटाचा धमाका; 3 दिवसांत कमावले तब्बल इतके कोटी रुपये

| Updated on: Apr 24, 2023 | 8:44 AM

पहिल्या दिवशी सलमानच्या चित्रपटाने 15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. गेल्या दहा वर्षांत ईदच्या मुहूर्तावर इतकी कमी कमाई करणारा सलमानचा हा पहिला चित्रपट ठरला. 21 एप्रिल रोजी रमजानचा शेवटचा दिवस होता.

KKBKKJ | पहिल्याच वीकेंडला सलमानच्या चित्रपटाचा धमाका; 3 दिवसांत कमावले तब्बल इतके कोटी रुपये
सलमान खान
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. ॲडव्हान्स बुकिंग फारशी न झाल्याने पहिल्या दिवशी या चित्रपटाची कमाई अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाली. मात्र शनिवारी आणि रविवारी कमाईचा वेग सकारात्मक पहायला मिळाला. या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. सलमान खानच्या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. फक्त तीन दिवसांत या चित्रपटाने 50 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये समाविष्ट होईल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून व्यक्त होतं आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ची बॉक्स ऑफिस कमाई-

शुक्रवार – 15 कोटी रुपये

शनिवार – 25 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

रविवार – 26.25 कोटी रुपये

एकूण – 64.25 कोटी रुपये

पहिल्या दिवशी सलमानच्या चित्रपटाने 15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. गेल्या दहा वर्षांत ईदच्या मुहूर्तावर इतकी कमी कमाई करणारा सलमानचा हा पहिला चित्रपट ठरला. 21 एप्रिल रोजी रमजानचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे लोक ईदच्या तयारीत व्यस्त होते. म्हणूनच कमाईचा आकडा कमी पहायला मिळाला. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची चांगली कमाई झाली.

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमानच्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाची कमाई-

2010 – दबंग – 14.50 कोटी रुपये
2011 – बॉडीगार्ड – 21.60 कोटी रुपये
2012 – एक था टायगर – 32.93 कोटी रुपये
2014 – किक – 26.40 कोटी रुपये
2015 – बजरंगी भाईजान – 27.25 कोटी रुपये
2016 – सुलतान – 36.54 कोटी रुपये
2017 – ट्युबलाइट – 21.15 कोटी रुपये
2018 – रेस 3 – 29.17 कोटी रुपये
2019 – भारत – 42.30 कोटी रुपये
2023 – किसी का भाई किसी की जान – 15.81 कोटी रुपये

या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, व्यंकटेश डग्गुबती, जगपती बाबू, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल यांच्या भूमिका आहेत. सलमानचा हा चित्रपट दोन कारणांसाठी खास मानला जातोय. पहिलं म्हणजे जवळपास तीन वर्षांनंतर सलमानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चार वर्षांनंतर ईदच्या मुहूर्तावर सलमानचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. खुद्द सलमानने या चित्रपटासाठी मोठी फी आकारली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने तब्बल 50 कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय.