अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी अखेर हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. गेल्या आठवड्यात या दोघांनी लग्नगाठ बांधली.
सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. अथिया आणि राहुलने शेअर केलेल्या या फोटोंवरून त्यांच्या हळदीचा कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडल्याचं दिसतंय.
दोघांनीही या फोटोंना 'सुख' असं कॅप्शन दिलं आहे. 21 जानेवारीपासून अथिया आणि राहुलच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. हळदीच्या कार्यक्रमालाही फक्त कुटुंबीय आणि मोजके पाहुणे उपस्थित होते.
आयपीएल सिझननंतर केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या रिसेप्शनचं आयोजन करणार असल्याची माहिती सुनील शेट्टी यांनी दिली.
हळदीच्या कार्यक्रमात अथियाने पिच-पिंक सूट परिधान केला होता.
अथिया आणि राहुलच्या लग्नाला डायना पेंटी, कृष्णा श्रॉफ, अन्शुला कपूर आणि अनुष्का रंजन यांची हजेरी लावली होती.
हळदीच्या कार्यक्रमातील काही खास क्षण..
एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. अथिया आणि राहुल हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
हळदीच्या कार्यक्रमातील या फोटोंवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.