बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे आगामी बवाल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, तो फ्लाॅप गेला.
नुकताच जान्हवी कपूर ही अर्जून कपूर याच्या घरी पार्टीसाठी गेली होती. विशेष म्हणजे यावेळी जान्हवी कपूर हिच्यासोबत तिच्या बॉयफ्रेंड शिखर पहाडिया हा देखील होता.
जान्हवी कपूर हिच्यासोबत प्रत्येक पार्टीमध्ये शिखर पहाडिया हा दिसतो. विशेष म्हणजे जान्हवी कपूर आणि शिखर यांचे एकाच शाळेत शिक्षण झाले असून ते बालपणीचे मित्र आहेत.
विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया हा आहे. अत्यंत लग्झरी लाईफ शिखर पहाडिया हा जगतो. त्याचे काही बिझनेस देखील आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिखर आणि जान्हवी यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा या रंगताना दिसत आहेत. मोठ्या संपत्तीचा मालक हा शिखर पहाडिया असून लग्झरी गाड्यांचे त्याच्याकडे मोठे कलेक्शन आहे. एंटरटेनमेंट आणि गेमिंगचा बिजनेस शिखर पहाडिया याचा आहे.