मुंबई: प्रसिद्ध गीतकार आणि गायक प्रतापसिंग बोदडे यांच्या भीमराज की बेटी या गाण्यानं अख्खा देशात धुमाकूळ घातला. त्यांच्या या गाण्याने त्यांना नाव, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांची इतर आंबेडकरी गीतेही प्रचंड गाजली. पण या लोकप्रियता आणि पैशाने ते हुरळून गेले नाहीत. कधी काळी भीक मिळण्यासाठी त्यांना गाणं गावं लागलं होतं, याची सल त्यांच्या मनात कायम आहे. नेमका काय आहे का किस्सा?, वाचा, बोदडे यांच्याच शब्दात. (know about singer pratap singh bodade’s unknown facts)
आई मोकळ्या विकायची अन् लहानगा प्रताप…
प्रतापसिंग बोदडे यांचे वडील बालचंद बोदडे हे तमाशा कलावंत होते. सीजनच्या काळात त्यांचे वडील तमाशासाठी दौऱ्यावर असायचे. त्यामुळे घरात पैसा यायचा. पण हा पैसा बारा महिने पुरायचा नाही. त्यामुळे कुणाच्या तरी शेतात जाऊन काम करावं लागायचं. त्याशिवाय पर्यायही नव्हता. एकदा एका व्यक्तिच्या शेतात काम करत असताना त्यांचे वडील झाडावरून पडले. त्यामुळे त्यांच्या एका गालाचा चेंदामेंदा झाला. परिणामी बालचंद बोदडे यांना वर्षभर अंथरूणावरच पडून राहवं लागलं. त्यामुळे तमाशाही बंद होता आणि इतरांच्या शेतातील काम करणंही. घराचा आर्थिक स्त्रोत थांबला होता. त्यामुळे त्यावर्षी बोदडे कुटुंबाची आर्थिक स्थिती खूपच वाईट झाली. प्रतापसिंग बोदडे यांची आई गीताबाई मोळ्या विकून घर चालवायची. पण घरात खाणारी आठ तोंडे. आई-वडील आणि बोदडे यांना धरून त्यांची सहा भावंडे. त्यामुळे मोळ्या विकून आलेल्या पैशातही भागत नसे. त्यामुळे प्रतापसिंग यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. लहानग्या प्रतापला गावात सहज भीक मागायची. शिवाय गावातील बायका लहानग्या प्रतापला गाणं गायला सांगायच्या. प्रतापने गाणं गाताच त्यांना त्या भीक द्यायच्या, हा किस्सा सांगताना बोदडे यांचा आवाज जड झाला होता अन् वातावरण धीरगंभीर.
नोकरी सोडली मुंबई गाठली
1977मध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा मोठा संप झाला. हा संप चांगला 20-22 दिवस चालला. त्यामुळे सरकारने नवीन नोकर भरती सुरू केली. त्यात बोदडेंनाही नोकरी लागली. त्यांच्याच गावात ते नायब तहसीलदार म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी तीही नोकरी सोडली आणि 1978 ला मुंबईत आले. मुंबईत त्यांनी रेल्वेत नोकरी पत्करली. मुंबईत कलावंतांचं माहेरघर असलेल्या चेंबूरमध्ये ते आले. चेंबूरच्या लालडोंगरमध्ये ते स्थायिक झाले. त्यावेळचे प्रसिद्ध कवी, गायक लक्ष्मणदादा केदार यांनी बोदडेंना भाड्याने खोली विकत घेऊन देण्यास मदत केली. इथेच त्यांना गोविंद म्हशीलकर आणि मारुती सरोदेंसारखी मातब्बर मंडळी भेटली. रेल्वेत नोकरीला लागल्यावर त्यांचा संसाराची गाडी रुळावर आली आणि गायकीलाही धुमारे फुटले.
बोदडेंची गाजलेली गाणी
थांबा हो थांबा, गाडीवान दादा,
बाळ एकटा मी भीवा माझे नाव,
राहिले फार दूर माझे गाव,
गाडीत घ्या हो मला…
आणि
उमर में बाली भोली भाली,
शील की झोली हूँ,
भीमराज की बेटी मैं तो,
जयभीमवाली हूँ…
दुश्मन भी मुझसे डरे,
गर टकराये तो मरे,
चीर सके दुश्मन का सीना,
मै वो गोली हूँ,
अरे भीमराज की…
आणि
घामाचे मोती, पेरून गेलाय
ओसाड रानातं,
दिसतोय तिथं भीमराव मला,
अंब्याच्या पानातं…
आणि
भीमाच्या अंगाचं पाणी, आहे का कुणातं,
ज्यानं बगिचा फुलविला, अख्ख्या बाभुय वनात…
आणि
पिकली ज्ञानाची दौलतं,
त्या महुच्या मातीतं,
एका उन्हाळ्या रातीतं…
घडलं नवलं धरणीवरं,
साऱ्या जगानं पाहिलं,
ज्ञान देणारा जन्मला,
एका अडाणी जातीतं… (साभार, आंबेडकरी कलावंत) (know about singer pratap singh bodade’s unknown facts)
संबंधित बातम्या:
स्टेजवर गाता गाताच बोदडेंना पॅरेलिसिसचा अॅटॅक आला, ग्रामस्थांकडून पै पै जमा; वाचा, पुढे काय घडलं?
मुलाचं गाणं ऐकून आईही ढसढसा रडली, म्हणाली, ‘बेटा, हे गाणं पुन्हा गाऊ नकोस!’; मन हेलावणारा किस्सा!
‘भीमराज की बेटी मै तो…’ हे गाणं लग्नाच्या मिरवणुकीत वाजतंच वाजतं; गीतकार कोण माहित आहे का?
(know about singer pratap singh bodade’s unknown facts)