Anand Ahuja | मित्रासाठी सेटिंग लावता-लावता स्वत:च सेट झाला, अशी सुरू झाली सोनम-आनंदची लव्हस्टोरी !

| Updated on: Jul 29, 2023 | 12:36 PM

आनंद अहुजा आणि सोनम कपूर हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल आहे. पण त्या दोघांची लव्हस्टोरी कशी सुरू झाली माहीत आहे का ?

Anand Ahuja | मित्रासाठी सेटिंग लावता-लावता स्वत:च सेट झाला, अशी सुरू झाली सोनम-आनंदची लव्हस्टोरी !
Follow us on

Anand Ahuja Birthday : आनंद आहुजा (Anand Ahuja) हा देशातील प्रसिद्ध उद्योगपती आहे, तसेच अभिनेत्री सोनम कपूरशी (Sonam Kapoor) लग्न केल्यानंतर तो आणखी प्रसिद्धीझोतात आला. 29 जुलै 1983 रोजी दिल्लीत जन्मलेला आनंद आहुजा सोनम कपूरच्या प्रेमात कसा पडला, ही एक वेगळीच कहाणी आहे. आज आनंदच्या वाढदिवसानिमित्त त्या दोघांची आगळी-वेगळी लव्हस्टोरी जाणून घेऊया.

कोण आहे आनंद आहुजा ?

आनंदचे आजोबा हरीश आहुजा हे शाही एक्स्पोर्ट्स या प्रसिद्ध कंपनीचे मालक आहेत. तर आनंदचा भाने हा फॅशन ब्रँडही प्रसिद्ध आहे. तसेच तो शाही एक्स्पोर्टचा मॅनेजिंग डायरेक्टही आहे. आनंदचे वडील सुनील आहुजा देखील कपड्यांचा व्यवसाय करतात, तर त्याच्या आईचे नाव बीना आहुजा आहे. आनंदला एक बहीण प्रियदर्शिनी आणि अनंत व अमित आहुजा हे दोन भाऊ आहेत. दिल्लीतून सुरुवातीचे शिक्षण घेतलेल्या आनंदने पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या वेस्टर्न स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली.

मित्राचे सोनमसोबत सेटिंग लावायला गेला होता आनंद

आनंद आणि सोनमचे आता लग्न झाले असले तरी एक काळ असा होता, जेव्हा त्या दोघांच्या लव्हस्टोरीचे काही कनेक्शनच नव्हते. वाचून हैराण झालात ना ? पण हे खरं आहे. खरंतर आनंद त्याच्या एका मित्राचे सोनमसोबत सेटिंग लावण्याचा प्रयत्न करत होता. सोनम आणि त्याच्या मित्रामध्ये तो मध्यस्थ म्हणून काम करत होता. पम सोनम त्याच्याशी कठोरपणे वागायची. आनंदच्या मित्राला तिच्याशी बोलायचं आहे तर तो आनंदला मध्ये का आणतो, यावरून ती चिडली होती.

भांडणानंतर झालं प्रेम

एवढ्या भांडणानंतरही आनंद व सोनम एकत्र कसे आले हा प्रश्न निर्माण होतो ? त्याबद्दल सोनमने एका मुलाखतीत खुलासा केला होता. सुरुवातीला तिला आनंदचा खूप राग यायचा, पण हळूहळू तिचा आनंदकडे कल वाढू लागला. सुमारे दोन आठवड्यांच्या संभाषणानंतर सोनमने आनंदला विचारले होते की, तुला अजूनही असं वाटतं का की तुझ्या मित्राने मला मेसेज करावा ? त्यावर आनंद म्हणाला, ‘अजिबात नाही… आता फक्त माझ्याशी बोल… मला तुला माझ्यासाठी ठेवायचे आहे.’ यानंतर दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले आणि 2018 मध्ये लग्न केले. आता त्यांना एक छोटा मुलगाही आहे.