मुंबई : बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. जान्हवी कपूर आणि वरूण धवन यांचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, या चित्रपटाला काहीच धमाका करण्यात यश मिळाले नाही. जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. मध्यंतरी चर्चा होती की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे लवकरच लग्न करणार आहेत.
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी त्यांच्या नात्याबद्दल अजून काही खुलासा हा केला नाहीये. मात्र, सतत हे दोघे एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीमध्ये धमाकेदार डान्स एकसोबत करताना जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे दिसले होते. मुंबईमध्ये तर हे कायमच एकत्र फिरतात.
जान्हवी कपूर ज्या शिखर पहाडिया याला डेट करत आहे, जो शिखर पहाडिया कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. फक्त हेच नाही तर जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे शिक्षणही एकसोबत झाले आहे. विशेष म्हणजे शिखर पहाडिया हा महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू आहे. सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया हा आहे.
शिखर पहाडिया याचे शिक्षण हे धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये झाले असून त्याने पदवी ही लंडनच्या रीजेंट युनिव्हर्सिटीमधून घेतली आहे. धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे एकत्रच शिक्षण झाले आहे. यापूर्वीही काही वर्षे जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी एकमेकांना डेट केले आहे.
2018 मध्ये शिखर पहाडिया याने एंरटेनमेंट आणि गेमिंगचा बिझनेस सुरू केला. शिखर पहाडिया हा अत्यंत आलिशान असे आयुष्य जगतो. कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. असे सांगितले जातंय की, शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. मध्यंतरी चर्चा होती की, शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर यांनी लपून लग्न केले आहे.