Uorfi Javed | उर्फी जावेद बद्दलच्या ‘या’ 3 धक्कादायक गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत, लहानपणी तिला

| Updated on: Jun 12, 2023 | 5:19 PM

उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. उर्फी जावेद हिच्यावर नेहमीच तिच्या कपड्यांमुळे टीका केली जाते. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच काही महिला या उर्फी जावेद हिच्या कपड्यांच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरल्या होत्या.

Uorfi Javed | उर्फी जावेद बद्दलच्या या 3 धक्कादायक गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत, लहानपणी तिला
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले एक नाव म्हणजे फक्त उर्फी जावेद (Uorfi Javed) हे आहे. उर्फी जावेद हिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका ही केली जाते. अनेकांनी तर थेट उर्फी जावेद हिला जीवे मारण्याच्या धमक्या या देखील दिल्या आहेत. मात्र, उर्फी जावेद हिला मिळणाऱ्या धमक्यांचा काहीच परिणाम होत नाही. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांसाठी ओळखली जाते. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नाही. उर्फी जावेद हिने तिच्या कपड्यांमुळे एक खास ओळख ही नक्कीच मिळवली आहे. आज सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही उर्फी जावेद हिची बघायला मिळते. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे मोठ्या वादात देखील सापडते.

उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीपासून मिळालीये. उर्फी जावेद हिने अगदी कमी कालावधीमध्ये एक ओळख मिळवली आहे.

आज उर्फीची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. इतकेच नाही तर आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ ही शेअर करताना उर्फी जावेद ही दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून उर्फी जावेद ही महिन्याला तगडी कमाई करते. उर्फी जावेद हिच्या महिन्याच्या कमाईमध्ये आपण मुंबईमध्ये एक आलिशान घर देखील खरेदी करू शकतो.

उर्फी जावेद हिने तिच्या आयुष्यात अत्यंत वाईट दिवस हे बघितले आहेत. इतकेच नाही तर उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच खुलासा केला की, लहान वयात ती डिप्रेशनची शिकार झाली होती, इतकेच नाही तर थेट आत्महत्या करण्याचे विचार तिच्या मनात यायचे आणि थेट तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता. उर्फी जावेद हिच्या या बोलण्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता.

उर्फी जावेद हिने सांगितले की, तिचा फोटो कोणीतरी थेट पाॅर्न साईटवर अपलोड केला होता. ज्यानंतर घरच्यांनी तिला खूप जास्त मारहाण केली होती. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा करत म्हटले होते की, माझे वडील मला खूप जास्त मारहाण करायचे. बऱ्याच वेळा मी बेशुध्द देखील होत असतं. उर्फी जावेद ही मुळ उत्तर प्रदेशची आहे.