बॉलिवूड इंडस्ट्रीतील खास मैत्रिणी सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी नुकतीच ‘कॉफी विथ करण 7’ (Koffee With Karan 7) या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या सर्वांत लोकप्रिय शोच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये या दोघी एकत्र झळकल्या होत्या. यावेळी करणने (Karan Johar) दोघींना त्यांच्या खासगी आयुष्याबाबत बरेच प्रश्न विचारले. “तुझा एक्स बॉयफ्रेंड हा तुझा एक्स का आहे?” असा प्रश्न त्याने साराला विचारला. तर “तू तुझ्या एक्स बॉयफ्रेंडसोबत सेक्स करणार का”, असा अत्यंत खासगी प्रश्न त्याने जान्हवीला (Janhvi Kapoor) विचारला. करणच्या या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता जान्हवीने उत्तर दिलं.
“नाही, पुन्हा मागे जाणार नाही”, असं स्पष्ट उत्तर जान्हवीने करणला दिलं. याच एपिसोडमध्ये सारा आणि जान्हवीने दोघा भावंडांना एकत्र डेट केल्याचा खुलासा करणने केला. “मी कोरोना महामारीपूर्वीची गोष्ट सांगतोय. तुमची मैत्री आता कोणत्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे हे मला माहित नाही, पण तुम्ही दोघींनी आधी दोन भावंडांना डेट केल्याचं मला माहितीये”, असं करण म्हणाला. करणकडून हा खुलासा होताच सारा आणि जान्हवी यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. करण शोमध्ये याबद्दल काही बोलणार हे तुला माहित होतं का, असा प्रश्न त्या दोघी एकमेकांना विचारू लागतात.
हा एपिसोड प्रसारित होताच चाहत्यांनी ती दोन भावंडं कोण होती, याचा शोध सुरू केला. काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले, ज्यातून हे स्पष्ट झालं की सारा आणि जान्हवीने दोन भावंडांना डेट केलं होतं. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू वीर पहारियाँ आणि शिखर पहारियाँ यांना सारा-जान्हवीने डेट केल्याचं म्हटलं गेलं. या एपिसोडमध्ये सारा आणि जान्हवी या एकमेकींच्या मैत्रीबद्दल व्यक्त झाल्या. या दोघींच्या मैत्रीची सुरुवात कुठून झाली आणि कशा पद्धतीने मग दोघी एकमेकींसोबत फिरायला जाऊ लागले, याबद्दल त्यांनी सांगितलं.