ओरी हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ओरी हा अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींसोबत अत्यंत खास फोटो काढताना दिसतो. बाॅलिवूड अभिनेत्रींसोबत कायमच पार्टी करताना दिसतो.
हेच नाही तर ओरी हा बिग बाॅस 17 मध्ये देखील दाखल झाला होता. नुकताच आता ओरी हा करण जोहर याच्या कॉफी विथ करण 8 शोमध्ये पोहचला.
यावेळी करण जोहर याने ओरी याला विचारले की, ट्रोल्स आणि सतत तुझ्यावर मीम्स वगैरे बनतात. मग या सर्व गोष्टींना तू कसा बघतोस. यावर ओरीने जबरदस्त उत्तर दिले.
ओरी थेट म्हणाला की, ते लोक मीम्स बनवतात आणि मी पैसा कमावतो...आता ओरीच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
ओरी हा अत्यंत लग्झरी लाईफ जगतो. ओरी हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. ओरीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.