‘कोई मिल गया’ सिनेमातील जादू आज प्रत्येकाला आठवत असेल. 2003 मध्ये प्रदर्शित झालेला आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी दिग्दर्शित सिनेमा कोणी विसरू शकेल… हे शक्य नाही. सिनेमातील काही सीन आणि फोटो सोशल मीडियावर आजही तुफान व्हायरल होत असतात. सिनेमात अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री प्रिती झिंटा हिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर सिनेमातील बच्चा पार्टीने धम्माल केली होती. सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली बच्चापार्टी आता मोठी झाली आहे. हृतिक याच्या मित्रमंडळींमधील एक चिमुकला म्हणजे बिट्टू सरदार. सिनेमा प्रदर्शित होऊन 20 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे.
बिट्टू सरदार आता मोठा झाला आहे. बिट्टू सरदार याचे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल. ‘कोई मिल गया’ सिनेमात बिट्टू सरदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं खरं नाव अनुज पंडित शर्मा आहे. आता अभिनेता प्रचंड हँडसम दिसू लागला आहे. त्याचे फोटो सध्या सोशस मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
अनुज पंडित शर्मा यांचं 20 वर्षांमध्ये झालेलं ट्रान्सफॉरमेशन हैराण करणारं आहे. सिनेमात अनुज क्यूट आणि खोडकर स्वभावाचा होता. पण आता अनुज याच्यापुढे बॉलिवूड अभिनेते देखील फेल आहेत. अनुज बियर्ड लूकमध्ये प्रचंड हँडसम दिसत आहे.
अनुज सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अनुज प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. अनुज सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर अनुज याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर अनुज याला 125K नेटकरी फॉलो करतात. तर अनुज फक्त 648 लोकांना फॉलो करतो.
अनुज पंडित शर्मा याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने फक्त सिनेमांमध्येच नाहीतर, मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. टोटल सियाप्पा आणि डरना मना है या मालिकांमध्ये देखील अभिनेत्याने महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.
अनुज पंडित शर्मा याने डिस्ने प्लस हॉट स्टारच्या बामिनी एन्ड बॉईज या वेबसिरीजमध्येही काम केले आहे. अभिनेत्याच्या आणखी काही मालिकांबद्दल सांगायचं तर, तो हुकुम मेरे आका, हिरो – भक्ती ही शक्ती है, परवरिश सीझन 2, क्राईम पेट्रोलचे काही भाग आणि बच्चों की अदालत सारख्या शोमध्ये दिसला आहे.