वादग्रस्त ट्विट आणि विनयभंग प्रकरणात अभिनेता आणि चित्रपट समिक्षक कमाल राशीद कुमार (KRK) याला नुकतीच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये त्याला नंतर जामिन मंजूर झाला. मात्र कारागृहात असताना फक्त पाणी पिऊन दिवस काढल्याचं वक्तव्य आता केआरकेनं केलं आहे. यामुळे दहा किलो वजन (Weight) कमी झाल्याचंही त्याने सांगितलंय. मंगळवारी सकाळी केआरकेनं यासंदर्भातील ट्विट्स केले आहेत.
‘लॉकअपमध्ये असताना दहा दिवस मी फक्त पाणी पिऊन जगलोय. त्यामुळे माझं 10 किलो वजन कमी झालंय’, असं ट्विट केआरकेनं केलं. अवघ्या काही मिनिटांतच त्याचं हे ट्विट व्हायरल झालं आणि त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. नेटकऱ्यांनी केआरकेला पुरावा दाखवण्याचीही मागणी केली आहे.
I was surviving with only water for 10 days in lockup. So I have lost 10 kg weight.
— KRK (@kamaalrkhan) September 13, 2022
‘साफ खोटं.. मीसुद्धा हेच करण्याचा प्रयत्न केला. पण दहा दिवसांत काहीच वजन कमी झालं नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुझं वजन आधीच 50 किलो होतं. आता तर तुला खिशात दगड ठेवून चालावं लागत असेल, जेणेकरून जोरात हवा आली तर तू उडून जाणार नाही’, अशीही खिल्ली युजर्सनी उडवली. ‘ज्यांना वजन कमी करायचं असेल, त्यांनी हे करून पहा’, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.
Jhut mat bolo Bhai Pani ke sath Dande bhi to khaye honge na ? https://t.co/unapn5R4cH
— H I T E S H ? (@Real_hitesh28) September 13, 2022
Krk you can now make videos on fitness too. How to losse 10kg in 10 days with no exercise?
Just be creative ?and give credit to MHARASTRA POLICE https://t.co/5sjg28fPBr— Chandrakant Gwal (@Chandrakantgwal) September 13, 2022
केआरकेला अनेकांनी आधीचा आणि आत्ताचा फोटोसुद्धा पोस्ट करायला सांगितलं आहे. त्याचप्रमाणे कारागृहातील दिवस कसे होते, यावरसुद्धा रिव्ह्यू कर, असंही काहींनी म्हटलंय. ‘आता तू स्वत:च्या फिटनेसवर व्हिडीओ बनवू शकतोस’, अशा शब्दांत एका युजरने मस्करी केली. या ट्विटवरून अनेकांनी केआरकेला ट्रोल केलं आहे.
People looking to loose weight. This is how you do it. https://t.co/tmIdOiXdel
— Mudit Singh (@RSMudit) September 13, 2022
मूळचा उत्तरप्रदेशमधील सहारनपूर इथला असलेला केआरके काही हिंदी चित्रपटांमध्येही झळकला आहे. त्याने सितम आणि देशद्रोही यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. सध्या तो देशद्रोही 2 या सीक्वेलवर काम करत आहे. 2014 मध्ये तो ‘एक व्हिलन’ या चित्रपटातही झळकला होता.