Salman Khan : अभिनेता सलमान खान (salman khan) याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. शिवाय अभिनेत्याने अनेक नव्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर संधी दिली. अनेकांचा गॉड फादर असलेल्या सलमान खान याच्या चाहत्यांच्या संख्येप्रमाणे अभिनेत्याच्या विरोधकांची संख्या देखील फार मोठी आह. कमाल राशिद खान उर्फ केआरके (krk) देखील कायम सलमान खान याचा विरोध करताना दिसतो. आता देखील केआरके याने नाव न घेता सलमान खान याला करियर संपवण्याची धमकी दिली आहे. सध्या सर्वत्र केआरकेच्या ट्विटची चर्चा आहे. केआरके याने ट्विटच्या माध्यमातून अभिनेत्यावर नाव न घेता निशाणा साधला.
नुकताच, सलमान खान याचा ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातील पहिलं गाणं ‘नैयो लगदा’ प्रदर्शित झालं आहे. ‘नैयो लगदा’ गाण्याला गायक हिमेश रेशमिया याने आवाज दिला आहे. गाण्यात सलमान खान याचा रोमांटिक अंदाज दिसून येत आहे. ‘नैयो लगदा’ गाण्यात सलमान याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसत आहे. याच गाण्याला केंद्रस्थानी ठेवत केआरके याने सलमानवर निशान साधला आहे.
Himesh Reshamiya Ne 80s song Pel Diya #DheereDheere! Himesh Ne Kaha, Ki Budhaoo Koi Aur Kare Yaa Na Kare, Lekin main Tera career Khatam Karke Hi Rahoonga.
— KRK (@kamaalrkhan) February 13, 2023
सोमवारी केआर ट्विट करत म्हणाला, ‘हिमेश रेशमिया याने ८० दशाकातील गाणं तयार केलं आहे. हिमेश म्हणाला कोणी दुसऱ्याने केलं किंवा नाही केलं… मी मात्र तुझं करियर संपवणार आहे…’ या ट्विटमध्ये केआरके याने सलमान खान याचं नाव न घेता अभिनेत्यावर निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र केआरकेचं ट्विट व्हायरल होत आहे. (krk net worth)
गेल्या अनेक वर्षांपासून केआरके आणि सलमान खान यांच्यात तुफान वाद सुरु आहे. दोघांमध्ये असलेला वाद न्यायालयात देखील पोहोचला आणि केआरके याने सलमानविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य न करण्याचे आश्वासन दिलं होतं. यावर सलमान पुन्हा कोर्टात पोहोचला आणि अवमानाच्या कारवाईची मागणीही केली.
वाद अधिक पेटल्यानंतर न्यायालयाने सलमानच्या सिनेमांचं रिव्ह्यू न करण्याचे आदेश केआरके याला दिले. पण तरी देखील आता अभिनेत्याने नाव न घेता सलमान खान याच्यावर निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र सलमान आणि केआरके यांच्या वादाची चर्चा रंगत आहे.
अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा चाहत्यांच्या भेटील येणार आहे. सिनेमात अभिनेत्री शहनाज गिल देखील मुख्य भूमिकेत दिसणार. शहनाज ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. म्हणून चाहते देखील ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.