Krushna Abhishek and Kashmira Shah : बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्हस्टोरी आहेत, ज्या आजही चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटींच्या लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचल्या तर काहींचं मात्र ब्रेकअप झालं. झगमगत्या विश्वातील एक अशी लव्हस्टोरी आहे, जी वन नाईट स्टँडनतंर सुरु झाली. विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आणि अभिनेत्री कश्मीरा शाह (Kashmira Shah) यांची लव्हस्टोरी देखील अत्यंत खास आहे. कश्मिरा अत्यंत बोल्ड आहे. टीव्ही विश्वात तिची ओळख देखील बोल्ड अभिनेत्री म्हणून आहे. कश्मीरा आणि कृष्णा यांनी त्यांच्या प्रेम कहाणीबद्दल सर्वांना सांगितलं आणि सर्वत्र खळबळ माजली.
कश्मीरा एका मुलाखतीत म्हणाली, ‘आमच्या नात्याची सुरुवात वन नाईट स्टँडने झाली होती.’ यावर कृष्णा म्हणाला, ‘प्रत्येकाच्या लव्हस्टोरी सुरुवात अशीच होते. फक्त लोक त्याला मान्य करत नाहीत. पण त्या दिवसानंतर कश्मीरा माझी अधिक काळजी करु लागली. ती माझ्यासाठी जेवणाचा डब्बा देखील आणू लागली होती.’ (Krushna Abhishek and Kashmira Shah)
पुढे कृष्णा म्हणाला, ‘एकदा असं झालं की, आम्ही कारमध्ये बसलो होतो आणि लाईट गेली. तेव्हा मी म्हणालो काय करायचं…’ त्या दिवसानंतर कश्मीरा आणि कृष्णा यांच्यामध्ये प्रेम बहरलं आहे. आज दोघेही एकत्र राहतात. त्या दिवसानंतर कोणत्याही गोष्टीचा तमा न बाळगता कृष्णा आणि कश्मीरा यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या नात्याला अधिक महत्त्व दिलं. (Krushna and Kashmira love story)
जेव्हा कृष्णा आणि कश्मीरा एकमेकांच्या प्रचंड जवळ आले होते, तेव्हा अभिनेत्री विवाहित होती. पण कश्मीराच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढ – उतार येत होते. म्हणून अभिनेत्री घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कृष्णा प्रचंड आनंदी झाला. कश्मीरा कृष्णापेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. पण दोघांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला.
कश्मीरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कश्मीरा स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो.
तर कृष्णाबद्दल सांगायचं झालं तर, तो अभिनेते कृष्णा याचा भाचा आहे. कृष्णा याने स्वतःच्या विनोदबुद्धीने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. कृष्णा कायम विनोद करत चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. (Krushna and Kashmira life style)