झगमगत्या विश्वातील काही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजते. आता तेलंगणाच्या कॅबिनेट मंत्री कोंडा यांनी अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नागा चैतन्य आणि समंथा यांच्या घटस्फोटाला कोंडा यांनी बीआरएसचे अध्यक्ष केटी रामाराव यांना जबाबदार ठरवलं आहे. ज्यामुळे सध्या वातावरण तापलं आहे. तर दुसरीकडे अभिनेते नागार्जुन यांनी यावर कायदेशीर कारवाई करणार असं सांगितलं आहे.
समंथा – नागा चैतन्य यांच्या घटस्फोटावर कोंडा सुरेखा म्हणाला, ‘केटीआर यांच्यामुळे नागा चैतन्याचा घटस्फोच झाला आहे. कारण एन. कन्वेन्शन हॉलवर हातोडा पडू नये म्हणून तुम्हाला समंथाला माझ्याकडे पाठवावं लागलं होतं. समंथा तू केटीआर यांच्याकडे जा नाहीतर, घटस्फोट दे… असं समंथाला सांगण्यात आलं होतं. याबद्दल संपूर्ण इंडस्ट्रीला माहिती आहे.’ असं कोंडा म्हणाले होते.
Minister Konda Surekha says KTR is the reason for divorce of actors Naga Chaitanya and Samantha
Lot of heroines got married quickly & moved out of cinema field bcos of KTR
KTR took drugs, got them habituated and did rave parties, played with their lives and did blackmail.… pic.twitter.com/gJcQstUpPb
— Naveena (@TheNaveena) October 2, 2024
सध्या सोशल मीडियावर कोंडा सुरेखा यांचा एका व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एक्सवर नवीना यांनी पोस्ट केलेला एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय कॅप्शनमध्ये त्यांनी मोठा खुलासा देखील केला आहे.
नवीना म्हणाल्या, ‘केटीआर यांच्यामुळे समंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला असं कोंडा सुरेखा यांचं म्हणणं आहे. अभिनय विश्वात पदार्पण केल्यानंतर अनेक अभिनेत्रींना लग्न केलं आणि केटीआरमुळे सिनेविश्वातून बाहेर पडल्या. केटीआर यांनी अभिनेत्रींनी ड्रग्सची सवय लावली, रेव्ह पार्ट्या केल्या. अभिनेत्रींच्या जीवाशी खेळले आणि त्यांना ब्लॅकमेल केलं… हे सर्वांना माहिती आहे…’ असं देखील ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे.
నా వ్యాఖ్యల ఉద్దేశం మహిళల పట్ల ఒక నాయకుడి చిన్నచూపు ధోరణిని ప్రశ్నించడమే కానీ మీ @Samanthaprabhu2 మనోభావాలను దెబ్బతీయడం కాదు.
స్వయం శక్తితో మీరు ఎదిగిన తీరు నాకు కేవలం అభిమానం మాత్రమే కాదు.. ఆదర్శం కూడా..
— Konda surekha (@iamkondasurekha) October 2, 2024
सांगायचं झालं तर, प्रकरण वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर कोंडा सुरेखा यांनी समंथा हिची माफी देखील मागितली आहे. कोंडा सुरेखा म्हणाल्या, माझ्या वक्तव्याचा उद्देश एका नेत्याकडून सतत महिलांना दाखवल्या जाणाऱ्या कमीपणावर आहे… मला कोणाच्या भावनांना ठेच पोहोचवायची नव्हती. माझ्या वक्तव्यामुळे तुझ्या किंवा चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेते…’ असे कोंडा म्हणाल्या आहेत.