नाशिकः तुर्कीश कादंबरीकार ओरहान पामुक (Orhan Pamuk) म्हणतो, अनेक तरुण आयुष्याच्या काही निश्चित क्षणी प्रेमात का पडतात, तर त्यांनी त्या दिवसांत कोणत्या ना कोणत्या ओळी, कोणत्या तरी गोष्टी किंवा कोणते तरी पुस्तक वाचलेले असते. या प्रेरणेतूनच त्यांनी आपल्या प्रियजनांशी आयुष्यभराची लग्नगाठ बांधली आणि नेहमीसाठी सुखी झाले. पुस्तकं, कविता जीवनात इतक्या महत्त्वाच्या असतात. सध्याही व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय. त्याची अनेक तरुण, तरुणी वाट पाहतायत. पत्र लिहिण्याचा काळ केव्हाच सरला. मात्र, प्रेमाने भारलेल्या कविता व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड करायचा सुळसुळाट सुरूय. त्यात कुमार विश्वास (Kumar Vishwas) या हिंदीतल्या तरुण कवीच्या तरल कवितांचा नक्कीच समावेश असतो. याच कुमार विश्वास यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त ही तरल सफर. कुमार यांची एक कविताय. त्यात ते म्हणतात…
जब भी मुँह ढक लेता हूँ
तेरे जुल्फों के छाँव में
कितने गीत उतर आते है
मेरे मन के गाँव में
एक गीत पलकों पर लिखना
एक गीत होंठो पर लिखना
यानि सारी गीत हृदय की
मीठी-सी चोटों पर लिखना
जैसे चुभ जाता है
कोई काँटा नँगे पाँव में
ऐसे गीत उतर आते हैं,
मेरे मन के गाँव में
पलकें बंद हुई तो जैसे
धरती के उन्माद सो गये
पलकें अगर उठी तो जैसे
बिन बोले संवाद हो गये
जैसे धूप, चुनरिया ओढ़,
आ बैठी हो छाँव में
ऐसे गीत उतर आते हैं,
मेरे मन के गाँव में
कुटुंबात सर्वात लहान
कुमार विश्वास यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1970 चा. त्या दिवशी वसंत पंचमी होती. उत्तर प्रदेशातल्या गाजिबादमधल्या पिलखुआ गावातील एका मध्यवर्गीय कुटुंबात ते जन्मले. त्यांचे वडील डॉ. चंद्रपाल शर्मा पिलखुआ येथील आर. एस. डिग्री कॉलेजमध्ये शिकवायचे. त्यांच्या आई रमा शर्मा. शर्मा कुटुंबाचा चार भाऊ आणि एक बहीण असा मोठा परिवार. त्यात कुमार विश्वास सर्वात लहान. त्यांच्या पत्नीचे नाव आहे मंजू शर्मा.
शिक्षण सोडले तरीही…
कुमार विश्वास यांचे प्राथमिक शिक्षण पिलखुआतल्या लाला गंगा सहाय विद्यालयात झाले. राजपुताना रेजिमेंट इंटर कॉलेजमधून ते बारावी पास झाले. त्यांच्या वडिलांना वाटायचे मुलाने इंजिनिअर व्हावे. मात्र, कुमार विश्वास यांना कवितेची आवड. म्हणजे दोन्ही विरुद्ध टोक. शेवटी कंटाळून कुमार विश्वास यांनी शिक्षणच सोडले. मात्र, कवितेचे गारूड त्यांच्या मनावर कायम राहिले. या कवितेच्या प्रेमापोटीच त्यांनी साहित्य क्षेत्रातले शिक्षण सुरू ठेवले. हिंदीमध्ये त्यांनी एम.ए.पूर्ण केले. त्यांना सुवर्णपदकही मिळाले. पुढे त्यांनी ‘कौरवी लोकगीतों में लोकचेतना’ या विषयावर पीएच.डी. केली आणि नावापुढे डॉक्टर लागले.
अभिनय ते गीतकार
कुमार विश्वास यांनी आपल्या करिअरची सुरुवात राजस्थानातील एका कॉलेजमधून केली. आज हिंदीमधल्या मंचीय कवितेच्या सर्वाधिक लोकप्रिय चेहऱ्यापैकी ते एक आहेत. त्यांनी हजारो कविसंमेलने गाजवली. अनेक नियतकालीकांमधून त्यांचे लेखन सुरू असते. सोबतच त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गीतलेखनही केले. त्यांनी आदित्य दत्तच्या ‘चाय-गरम’ चित्रपटात अभिनयही केला आहे. त्यांचे एक पगली लड़की के बिन (1996), कोई दीवाना कहता है (2007) हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचा कोई दीवाना कहता है या कवितासंग्रहाला तरुणांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. कुमार विश्वास यांनी ‘तर्पण’ नावाचा एक कवितांचा कार्यक्रमही टीव्हीवर केला. त्यातून अनेक जुन्या गाजलेल्या कवींच्या रचना स्वतःच्या आवाजात सादर केल्या.
“ये मेरे हाथ में जो फूल का गुलदस्ता है,
ये मेरे पाँव के काँटों पे बहुत हँसता है..!” ?#Rose_day pic.twitter.com/8O6tRvsZeB— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) February 7, 2022
राजकारणात प्रवेश
आपल्या साऱ्यांना अण्णा हजारेंचे 2011 मधील आंदोलन आठवत असेल. त्या टीम अण्णाच्या सक्रिय सदस्यामध्ये कुमार विश्वासही होते. त्यांनी पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश केला. अमेठी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यात ते हरले. तेव्हापासून ते राजकारणात म्हणावे तसे सक्रिय नाहीत. ते म्हणतात, ‘सृजन का बीज हूँ मिट्टी में जाया हो नहीं सकता.’ राजकारण 10 वर्षे, 5 वर्षे. मात्र, कविता हजारो वर्षे.
कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है !
मगर धरती की बेचैनी को बस बादल समझता है !!
मैं तुझसे दूर कैसा हूँ, तू मुझसे दूर कैसी है !
ये तेरा दिल समझता है, या मेरा दिल समझता है !!
मोहब्बत एक अहसासों की पावन सी कहानी है !
कभी कबिरा दीवाना था, कभी मीरा दीवानी है !!
यहाँ सब लोग कहते हैं, मेरी आंखों में आँसू हैं !
जो तू समझे तो मोती है, जो ना समझे तो पानी है !!
समंदर पीर का अन्दर है, लेकिन रो नही सकता !
यह आँसू प्यार का मोती है, इसको खो नही सकता !!
मेरी चाहत को दुल्हन तू बना लेना, मगर सुन ले !
जो मेरा हो नही पाया, वो तेरा हो नही सकता !!
भ्रमर कोई कुमुदुनी पर मचल बैठा तो हंगामा!
हमारे दिल में कोई ख्वाब पल बैठा तो हंगामा!!
अभी तक डूब कर सुनते थे सब किस्सा मोहब्बत का!
मैं किस्से को हकीक़त में बदल बैठा तो हंगामा!!
इतर बातम्याः
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?