विवाहित कुमार सानू यांच्यासोबत पत्नीसारखी राहायची ही प्रसिद्ध अभिनेत्री; 5 वर्षे केलं डेट

| Updated on: Jan 14, 2025 | 3:21 PM

अभिनेत्री कुनिका सदानंद यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याविषयी खुलासे केले आहेत. गायक कुमार सानू यांच्यासोबतच्या अफेअरबद्दलही त्या मोकळेपणे व्यक्त झाल्या. कुमार सानू विवाहित असताना कुनिका यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते.

विवाहित कुमार सानू यांच्यासोबत पत्नीसारखी राहायची ही प्रसिद्ध अभिनेत्री; 5 वर्षे केलं डेट
कुनिका सदानंद आणि कुमार सानू
Image Credit source: Instagram
Follow us on

प्रसिद्ध अभिनेत्री कुनिका सदानंद यांनी नुकतीच दिलेली एक मुलाखत विशेष चर्चेत आली आहे. या मुलाखतीत त्या प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्यासोबतच्या अफेअरविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत कुनिका यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी सांगितलं. कुनिका या अभिनेत्रीसोबतच वकील, गायिका, निर्मात्या, सामाजिक कार्यकर्त्या आणि व्यावसायिक आहेत. कुनिका यांनी वयाच्या 28 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आपल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 110 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. कुनिका आणि कुमार सानू हे जवळपास पाच वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. उटीमध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यावेळी कुमार सानू हे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खुश नव्हते.

कुमार सानू यांनी सर्वांसोबत मद्यपान केलं आणि अचानक ते रडू लागले. इतकंच नव्हे तर त्यांनी हॉटेल रुमच्या खिडकीतून उडी मारण्याचाही प्रयत्न केला होता. “ते अचानक रडू लागले आणि त्यांनी हॉटेलच्या खिडकीतून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते नैराश्यात होते. आम्ही सर्वांनी त्यांना खूप समजावलं होतं”, असं कुनिका यांनी सांगितलं. या घटनेनंतर कुनिका आणि कुमार सानू यांच्यात जवळीक निर्माण झाली. मात्र पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी ब्रेकअप केलं.

हे सुद्धा वाचा

कुनिका यांनी खुलासा केला की उटीच्या ट्रिपनंतर कुमार सानू हे त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहू लागले होते. ते घराजवळच्याच दुसऱ्या इमारतीत राहू लागले होते. यावेळी कुमार सानू आणि कुनिका एकमेकांसोबत विवाहित दाम्पत्यासारखेच राहत होते. तेव्हा आमचं नातं शकुंतला आणि दुष्यंतसारखं होतं, असं त्या म्हणाल्या.

कुनिका यांनी अभय कोठारीशी पहिलं लग्न केलं होतं. त्यावेळी त्या 16-17 वर्षांच्या होत्या. लग्नाच्या वर्षभरातच त्यांना मुलगा झाला होता. त्यांचं हे लग्न अवघे दोन अडीच वर्ष टिकलं. त्यानंतर मुलाचं पालकत्व मिळवण्यासाठी त्यांना आठ वर्षे लढावं लागलं होतं. अखेर त्यांच्या मुलाने वडिलांसोबत राहायचं ठरवलं होतं. कुनिका यांनी वयाच्या 35 व्या वर्षी विनय लालशी दुसरं लग्न केलं होतं. त्यांचं दुसरं लग्नही अपयशी ठरलं होतं. त्यानंतर त्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहिल्या होत्या.