मुंबई : ‘रेगे’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पाऊल टाकणाऱ्या अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Welankar) ‘मराठी बिग बॉस सीझन-2’मधून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील चाहत्यांची मनं जिंकली. सध्या आरोह ‘लाडाची मी लेक गं’ या मराठी मालिकेतून रसिकांच्या भेटील येतो. आरोहच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. छोट्या पडद्यावरील हा मम्मीचा लाडका आता खऱ्या आयुष्यात बाबा झाला आहे (‘Ladachi lek’ fame actor Aroh Welankar and ankita shingavi welcomes baby boy).
आरोहच्या घरी आज (2 मार्च) चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाले असून, आई आणि बाळाची प्रकृती सुखरूप असल्याचे आरोहने म्हटले आहे.
अलीकडेच त्याच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचा शानदार कार्यक्रम पार पडला होता. सोशल मिडीयावर सक्रिय असणाऱ्या आरोहने इन्स्टाग्रामवर या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातले सुरेख फोटो शेअर केले होते.
अभिनेता आरोह वेलणकर, दीर्घकालीन मैत्रीण अंकिता शिंघवी सोबत तीन वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकला होता. अंकिता आणि आरोहची भेट कॉलेज कॅम्पसमध्ये झाली होती. आधी मैत्री आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
अंकिता आणि आरोहची भेट कॉलेज कॅम्पसमध्ये झाली होती. अंकिता तिच्या मैत्रिणींसह कॉलेजच्या कॉरीडोरमध्ये उभी होती त्यावेळी आरोह आणि त्याच्या मित्रांनी अंकिता आणि तिच्या मैत्रिणींना त्यांचा थिएटर ग्रुप जॉईन करण्यासाठी विचारले. आरोहला त्याच्या थिएटर ग्रुपसाठी कोरिओग्राफर आणि डान्सरची गरज होती. अंकिताच्या मैत्रिणींनी आणि अंकिताने यासाठी होकार दिला आणि त्यानंतर त्यांचे वरचेवर भेटणे, बोलणे सुरु झाले. हे वरचेवर भेटणे-बोलणे कधी मुव्ही डेट आणि कॉफीडेटमध्ये बदलले ते कळालेच नाही आणि त्यांचे अफेअर सुरु झाले. कालांतरानी त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आणि हे नाते लग्नात बदलले.
प्रविण तरडे लिखित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ या चित्रपटातून आरोहने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटातील त्याच्या अभिनयामुळे त्याला ‘घंटा’ हा चित्रपट मिळाला. या दोन्ही चित्रपटातील त्याच्या अभिनयाची चर्चा झाली. आरोहने रंगभूमीवर ‘व्हाय सो गंभीर’ या नाटकामध्येही काम केले असून, त्यात तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे मोठा पडदा आणि रंगभूमीनंतर त्याने ‘बिग बॉस’च्या माध्यमातून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. सध्या ‘लाडाची लेक गं’ या मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
(‘Ladachi lek’ fame actor Aroh Welankar and ankita shingavi welcomes baby boy)