लतादीदींच्या प्रकृतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; निर्मात्या अनुषा श्रीनिवासन यांचं आवाहन

| Updated on: Jan 22, 2022 | 1:59 PM

त्यांची तब्येत सुधारणी असून त्यांनी ठोस अन्न खाण्यास सुरूवात केली आहे.

लतादीदींच्या प्रकृतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; निर्मात्या अनुषा श्रीनिवासन यांचं आवाहन
लत्ता मंगेशकर (फाईल फोटो)
Follow us on

मुंबई – प्रख्यात गायिका लता मंगेशकर (latta mangeshkar) अजूनही आयसीयूमध्ये (icu) उपचार घेत आहेत, कोविड -19 (covid-19) मधून बरे झाल्या आहेत. तरीही त्याच्यावरची मुंबईतील ब्रीच कँडी (brich candy) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लत्ता मंगेशकर यांच्याबाबत पसरत असलेल्या खोट्या बातम्यांवर कोणीही विश्वास ठेऊ नका. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. लता दीदी बऱ्या होऊन घरी येण्यासाठी प्रार्थना करूया अशी पोस्ट चित्रपट निर्मात्या आणि लेखक अनुषा श्रीनिवासन अय्यर (anusha shinivasan iyer) यांनी केली आहे.

लत्ता दीदींना 9 जानेवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या सद्या आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत. पण काही समाजकंटकांनी खोट्या बातम्या पसरवल्या आहेत, अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. त्या लवकर ब-या होण्यासाठी पार्थना करा असं एका पोस्टमध्ये अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी चाहत्यांना सांगितलं आहे.

दीदींच्या प्रकृतीत सुधारणा

लत्ता दीदींचं वय सद्या 92 वर्षे आहे, त्यांची तब्येत सुधारणी असून त्यांनी ठोस अन्न खाण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे त्यांच्यात चांगली सुधारणा दिसून येत असून त्या सद्या व्हेंटिलेटरवर नाहीत. डॉ प्रतित समदानी आणि इतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोविड आणि न्यूमोनियाच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लता मंगेशकर यांच्या आरोग्याचे अपडेट्स रुग्णालयातील डॉक्टर जारी करत आहेत. मंगेशकर कुटुंबीयांकडून लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबतचे अपडेट्स दिले जात आहेत. सद्या त्यांची ‘लताजींची प्रकृती आता ठीक आहे. डॉक्टर बोलतील तेव्हा त्यांना घरी आणले जाईल.

सलमान खान म्हणतो, ‘मैं चला तेरी तरफ…’, नवं गाणं रिलीज, एका तासात 1 मिलीयनहून अधिक व्हूज
संगीत रंगभूमीच्या व्रतस्थ शिलेदार हरपल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली

Priyanka Chopra Surrogacy पद्धतीनं आई बनली, वाचा काय असते सरोगसी, भारतात यासंबंधीचे नियम काय?