मुंबईः अभिनेता संजय दत्ता ज्यावेळी शाळेत होता, त्यावेळी तो शाळेत ड्रम वाजवत होता. प्रिया दत्त (Priya Dutt) या प्रसंगाची आठवण करुन देताना एक आठवण आपले वडिल सुनील दत्त (Sunil Dutt) यांचीही सांगतात. संजय दत्तची (Sanjay Dutt) ही आवड बघून नंतर त्यांनी घरातच एक ड्रम सेट आणला होता. लता मंगेशकर गात असत त्यावेळी त्या आपल्यातच गुंग होऊन जात. त्यांच्या बाबतीत एक आठवण सांगितली जाते की, एक दिवस लाईव्ह कॉन्सर्टमध्ये लता मंगेशकर गाणं म्हणण्यासाठी पोहचल्या होत्या. त्यावेळी त्यांना गाणं म्हणताना त्यांना खूप त्रास झाला होता, आणि त्याचे कारण होते अभिनेता संजय दत्त. ही गोष्ट आहे ती संजय दत्त जेव्हा लहान होता आणि त्यांना संगीतातील अनेक वाद्य वाजवण्याचा छंद होता.
संजय दत्त अगदी लहान असल्यापासून ड्रम वाजवत होता, अगदी शाळेत गेल्यानंतरही तो आपली आवड जपत होता. त्याची आवड जपताना तो शाळेतच ड्रम वाजवण्याचा सराव करत होता, म्हणून त्याच्यासाठी सुनील दत्त यांनी त्याला घरातच ड्रम सेट आणून दिला होता. संजय दत्त ते खूप आवडीने वाजवत होता. कधी कधी तो ड्रम वाजवून घरातल्यांनी वैताग आणत होता.
सुनील दत्त यांना एकदा म्युजिकल कॉन्सर्टसाठी परदेशात जावं लागणार होतं. त्यामध्ये कित्येक कलाकार होते. ही गोष्ट जेव्हा संजय दत्तला समजली तेव्हा तोही म्हणाला की, या कार्यक्रमासाठी मी पण येणार आहे. मात्र सुनील दत्त यांनी त्याला घेऊन जाण्यासाठी नकार दिला. तरीही संजय दत्त हट्ट करत बसला की, बांग्लादेशातील त्या कार्यक्रमासाठी आपण येणारच आहे.
सुनील दत्त यांनी त्याला सांगितले की, या कॉन्सर्टसाठी येणारे आहेत ते सर्वजण कोणते ना कोणते वाद्य वाजवतात. असं सांगताच संजय दत्त म्हणाला की, मी ही एक वाद्य वाजवणार आहे. जीना इसी का नाम है या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या गायिका लता मंगेशकर आमच्यासोबत बांग्लादेशमध्ये आल्या होत्या. त्यावेळी संजय दत्तही हट्ट करुन म्हणाला की, मीही येणार आहे. त्यावेळी मी म्हटले तुला येता येणार नाही कारण येणारे सगळे वाद्य वाजवणारे कलाकार आहेत, त्यावेळी त्याने सांगितले की, मी बांगो वाजवणार.
बांग्लादेशातील लता मंगेशकर यांची आठवण सांगताना सुनील दत्त सांगत असत की, ज्यावेळी लतादीदी गाणं सादर करण्यासाठी रंगमंचावर आल्या त्यावेळी कार्यक्रमाती सगळे कलाकार एका रांगेत बसले होते. गाणं सुरु झाले, वाद्य वाजवणारेही त्यात गडून गेले मात्र दीदी गाणं सादर करताना सारखं सारखं थांबू लागल्या. त्यावेळी संजय दत्त वाजवत असलेला बांगो चुकीच्या पद्धतीने वाजवत होता. लता मंगेशकर यांना राग आला आणि त्यांनी मागे वळून बघितले तर संजय दत्त बांगो वाजवत होता. काही क्षणात त्यांचा राग निवळला, आणि त्याला त्या म्हणाल्या वाजवत राहा तू असं म्हणून त्या हसू लागल्या.
संबंधित बातम्या
भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड, मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार