बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचे मोठे प्रेम देखील कायमच मिळते. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचा गूडबाय हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट चांगलाच धमाका करताना दिसला. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत रश्मिका मंदाना ही मुख्य भूमिकेत धमाल करताना दिसली. अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक पुरस्कार मिळाले.
अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना अमिताभ बच्चन दिसतात. नुकताच एक अत्यंत मोठी घोषणा करण्यात आलीये. यानंतर अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळतोय.
अमिताभ बच्चन यांना नुकताच लता मंगेशकर पुरस्कार घोषित करण्यात आलाय. या पुरस्काराने अमिताभ बच्चन यांना सन्मानित केले जाणार आहे. यामुळे अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळतोय. नुकताच याबद्दलची घोषणा ही करण्यात आलीये. अमिताभ बच्चन नेहमीच चर्चेत असतात.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा 82 व्या पूण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा 24 एप्रिलला दीनानाथ नाट्यगृह येथे पार पडणार आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : अमिताभ बच्चन, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा प्रदीर्घ संगीत सेवा साठी ए आर रेहमान ,
मोहन वाघ उत्कृष्ट नाट्य निर्मितीसाठी पुरस्कार गालिब या नाटकाला आनंदमयी पुरस्कार जो आशा भोसले पुरस्कृत आहे.
समाजसेवासाठीचा पुरस्कार दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलला, वाग्विलासीनी प्रदीर्घ साहित्य सेवा पुरस्कार मंजिरी फडके, मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार अशोक सराफ, मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ चित्रपट सेवा पुरस्कार पद्मिनी कोल्हापूरे, मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ संगीत सेवा पुरस्कार रुपकुमार राठोड यांना मिळेल.
मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ पत्रकारिता पुरस्कार भाऊ तोरसेकर, मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार अतुल परचुरे, मास्टर दिनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार रणदीप हुडा यांना जाहीर करण्यात आला आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था गेली 34 वर्षे पुणे येथे कार्यरत आहे. ही संस्था मंगेशकर कुटुंबियांनीच स्थापन केली असून त्याचा मुळ उद्देश हा दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा स्मृतिदिन 24 एप्रिल रोजी प्रतिवर्ष साजरा करणे हा आहे. मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.
आत्तापर्यंत सुमारे 212 व्यक्तींना गेल्या 34 वर्षात हे पुरस्कार प्रदान केले आहेत. तसेच या दिवशी पुरस्कार सोहळ्यानंतर संगीत तथा नाट्य, नृत्य असे कलाक्षेत्रातील विविध कार्यक्रम केले जातात. तसेच 2022 वर्षापासून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ एक विशेष म्हणजे “लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार” प्रदान करण्याचे सर्व विश्वस्तांनी ठरविले आहे. त्यानुसार 24 एप्रिल 2022 रोजी भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला होता.