Lata Mangeshkar Death Anniversary : ‘मुझसे जुदा होकर’, ‘मैं तेरा दुश्मन’, ‘कोई लडका हैं’, ‘जिसका मुझे था इंतजार’, ‘हमको हमीसे चुरालो…’ यांसरख्या अनेक गाणी लता दीदी यांनी गायली आणि संगीताचा दर्जा यशाच्या उच्च शिखरावर पोहोचला. भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत, लतादीदींच्या निधनाला आज दोन वर्ष पूर्ण झालं आहे. तरी देखील दीदी आपल्यातच आहेत… आशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे. लता मंगेशकर यांचा स्मृती दिन आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही अशा गोष्टी जाणून घेऊ ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत.
लता दीदी यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान, दीदी यांचं निधन झालं. 6 फेब्रुवारी 2022 मध्ये लतादीदी यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि एका पर्वाचा अंत झाला. दोन वर्षांपूर्वी लतादीदी देशाला पोरकं करून गेल्या, पण आजही लता दीदी यांना कोणीच विसरु शकलेलं नाही. दीदी आज आपल्यात नाहीत, पण आज लतादीदी अनेक गोष्टी पुढच्या पिढीसाठी मागे ठेवून गेल्या. अनेकांच्या प्रेरणास्थानी दीदी आहेत.
अभिनेत्री तबस्सुम यांनी देखील दीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. तबस्सुम यांनी आयुष्यातील अनेक क्षण लतादीदी यांच्यासोबत व्यतीत केले. एका मुलाखतीत तबस्सुम यांनी सांगितलं, ‘लतादीदी यांच्यासारखं दुसरं कोणीही नाही..’ एवढंच नाही तर, दीदींच्या अनेक आठवणी तबस्सुम यांनी सांगितल्या.
तबस्सुम यांनी लतादीदी अविवाहित असताना का आणि कोणाच्या नावाचं सिंदूर लावचयच्या याबद्दल सांगितलं. तबस्सुम यांनी सांगितलं, ‘मी लतादीदी यांच्या अनेक मुलाखती घेतल्या. पण टेलिव्हीजनवर मुलाखात घेण्याची संधी कधी मिळाली नाही. एकदा दीदींना विचारलं होते लग्न झालेलं नसताना तुम्ही कोणाच्या नावाचं सिंदूर लावता?’
प्रश्नाचं उत्तर देताना लतादीदी हासल्या आणि म्हणाल्या, ‘माझ्या माथ्यावर असलेलं सिंदूर संगीताच्या नावाचं आहे.’ लतादीदी यांच्यासाठी संपूर्ण विश्व म्हणजे संगीत होतं. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संगीतावर प्रेम केलं. लतादीदींनी दिलेलं हे उत्तर हृदय पिळवटून टाकणार होतं. लतादीदींनी उभ्या आयुष्यात संगीतावर आकंठ प्रेम केलं.
लता दीदी यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांसाठी गायन केलं. सोशल मीडियावर आजही दीदी यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आज दीदी आपल्यात नसल्या तरी, आयुष्यात कितीही संकटं आली तरी पुढे चालत राहायचं… हे दीदी यांनी शिकवलं आहे. सांगायचं झालं तर, एका कलाकाराचं निधन कधीच होत नाही. कलाकाराची कला कायम जिवंत असते. लतादीदी देखील त्यांच्या संगीताच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहेत.