मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं आहे. आज सकाळी त्यांनी 8.12 वाजता अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) उपचार सुरु शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. कोरोना आणि न्यूमोनिया झाल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 28 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना सुरु आहेत. डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ. प्रतीत समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. लता मंगेशकर या कोरोना आणि न्यूमोनियातून मुक्त झाल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
टीम इंडियाकडून लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यात आली. काळी पट्टी बांधून टीम इंडियाच्या खेळाडूंनी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली.
The Indian Cricket Team is wearing black armbands today to pay their respects to Bharat Ratna Lata Mangeshkar who passed away today.
(Photo source: BCCI) pic.twitter.com/8YnjvsyeQI
— ANI (@ANI) February 6, 2022
लता मंगेशकर यांनी भारताची जी ओळख बनवली, भारतीय संगिताला जो स्वर दिला, त्यामुळे जगाला भारताकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. जगात लता मंगेशकर यांचे चाहते सर्वत्र पाहायला मिळतात. लता मंगेशकर स्वर आणि गाण्याच्या माध्यमातून आपल्यासोबत असतील. जड अंतकरणानं मी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहतो.
दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर यांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाहिली काव्यमय श्रद्धांजली
भारतरत्न लता मंगेशकर नाव हे राहील अजरामर
मनामनात गुंजत राहिल गाणकोकिळेचे सुमधुर स्वर
लतादीदींचा स्मृतिगंध दरवळत राहील भारतभर जगभर
लतादीदींचा आवाज त्यांची ओळख होती
दुःखावर औषध म्हणून त्यांच्या गायनाची गरज होती
गरिबांच्या दुःखावर मायेची
फुंकर होती
त्यांच्या गायनाने सैनिकांनाही प्रेरणा लाभत होती
ए मेरे वतन के लोगो जरा आखो मे भरलो पानी
या गीतातून सदैव ऐकत राहू लतादीदींची वाणी
गाणं कोकिळा स्वरसम्राज्ञी अजरामर ठरली
मी वाहतो लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली!
दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली!
रामदास आठवले
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
खऱ्या अर्थाने संगीताची दुनिया पोरकी झाली
काही गोष्टी अटळ असतात, आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत ही घटना घडणार असली तरी आजचा दिवस येऊ नये असं वाटत होतं
एकलव्य जसा दोर्णाचार्याकडे शिकला तसचं माझ्या सारखे अनेक जण त्यांचं गाणं पाहून शिकले
असंख्य आठवणी आहेत
त्यांची प्रेमाची कौतुकाची थाप विसरु शकणार नाही
हा दिवस बघायला लागायला नको होता
लतादिदींच्या जाण्यामुळे भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशी गायिका पुन्हा होईल असे वाटत नाही. गाणारे लोक अनेक आहेत पण लतादिदींसारखा आवाज, गाण्यातील भाव आणि संदेश हे दुर्मिळ आहे. भारतातील सर्व भाषांमधून गाणी गाणाऱ्या त्या एकमेव गायिका असाव्यात. त्यांनी गायिलेली भक्तीगीते, भावगीते व देशभक्तीपर गीते ही सामान्य माणसांना आनंद आणि प्रेरणा देणारी होती. वेगवेगळ्या क्षेत्रात कष्ट करणाऱ्या श्रमिकांनी थकल्यानंतर लतादिदींचे गाणे ऐकले किंवा त्यांचा आवाज कानावर पडला की, क्षणात श्रमपरिहार होत असे.
लतादिदींचा आणि माझा अनेक वेळा भेटण्याचा प्रसंग आला. त्यांच्या हस्ते मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण होता. पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार मिळाला तेव्हाही एवढा आनंद झाला नसेल. त्यांनी गायिलेले ‘ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहिद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी’ हे गीत विसरणे कदापि शक्य नाही. हे गीत ऐकताना पंतप्रधानांच्या आणि उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आले होते. आजही ते गीत ऐकताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. हे गाणे ऐकून लाखो लोकांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा जागृत होते.
भगवतगीतेत श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे ‘अंतःकाळी जो माझे नामस्मरण करतो त्याचा पवित्र आत्मा मलाच येऊन मिळतो’ याप्रमाणे लतादिदींना चिरशांती मिळालेलीच आहे यात शंका नाही. लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली.
लतादिदींच्या जाण्यानं बाळासाहेबानंतरचा मोठा आघात- रश्मी ठाकरे
मुंबई : लतादिदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दिदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठाआघात झाला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बाळासाहेब असतांना आणि नंतर देखील लतादिदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दिदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दिदी आज आपल्यात नाहीत, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावणार आहेत. मुंबईत 4.30 वाजता ते पोहोचतील अशी माहिती आहे.
पुन्हा लता मंगेशकर होणं नाही हे त्रिवार सत्य : अजित पवार
अजीब दास्ता है ये हे गाणं सर्वाधिक आवडतं
अजित पवारांकडून आजचे सर्व कार्यक्रम रद्द
लता मंगेशकर यांचं गाणं चिरंजीव आहे. त्या अजरामर आहेत. स्वरावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात त्यांचं स्थान आहे. लता मंगेशकर यांच्याशी अनेकदा भेट झाली होती.
लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे.
भारतीय संगीत क्षेत्राचा आत्म गमावला: देवेंद्र फडणवीस
By the demise of BharatRatna Lata Didi Mangeshkar, India not only has lost a voice, but the soul of Indian Music.
God took back its beautiful gift to all of us.
We lost Goddess of Indian Music.
Hard to believe she’s not with us.
We have lost an integral part of our life. pic.twitter.com/DOeZMdx9b1— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2022
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं आहे. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) उपचार सुरु शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
रश्मी ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचल्या असून त्या लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची माहिती घेतील.
– देशासाठी लतादीदीची प्रकृती हा चिंतेचा विषय
– जगाच्या पाठीवर लतादीदींनी देशाचे नाव मोठे केले आहे
– मी देखील प्रार्थना करतो
– लतादीदी या परमेशवरी अवतार आहेत
– जनतेच्या आशीर्वादाने त्या लवकर ब-या होतील
गानसम्राज्ञी लतादिदी लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी जगभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. लता दिदी यांची प्रकृती अद्याप नाजूक असल्याची माहिती आहे.
लता मंगेशकर यांना भेटावं वाटतंय, ताई बऱ्या व्हाव्यात, अशी प्रार्थना करत असल्याचं सुरेश वाडकर यांनी म्हटलं. सुरेश वाडकर यांनी लतादिदी मला कायम त्यांच्या कुटुंबाचा भाग मानतात, असं म्हटलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचणार आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची ते विचारपूस करणार आहेत.
ब्रीज कॅंडी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढला… रुग्णालयाला छावणीचं स्वरुप…
– आसपासच्या परिसरातील गाड्या ट्रॅफिक पोलिसांनी हटवून नो पार्किंग झोन तयार केला…
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे काही वेळात दाखल होणार असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढली …
बॉम्ब शोधक पथक रुग्णालयात दाखल,
लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती डाक्टरांकडून मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ब्रिज कॅंडी परिसराला छावणीचं स्वरुप…
आसपासच्या परिसरातील गाड्या ट्रॅफिक पोलिसांनी हटवण्यास केली सुरवात..
मुंबई
मनसे अध्य राज ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयातून निघाले
Raj Thackeray : राज ठाकरे ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे रुग्णालयात पोहोचले आहेत. राज ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्यातील संबंध जिव्हाळ्याचे राहिले आहेत.
डॉ. प्रतीत समदानी यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. लता मंगेशकर यांना सध्या व्हेंटिलेटर सपोर्ट लावण्यात आला आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे, अशी माहिती प्रतीत समदानी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. एएनआयनं यासंदर्भात ट्विट केलं आहे.
Veteran singer Lata Mangeshkar’s health condition has deteriorated again, she is critical. She is on a ventilator. She is still in ICU and will remain under the observation of doctors: Dr Pratit Samdani, Breach Candy Hospital
(file photo) pic.twitter.com/U7nfRk0WnM
— ANI (@ANI) February 5, 2022