मुंबईः गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची तब्बेत सुधारत असून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराला त्या प्रतिसाद देत असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या तब्बेतीबाबत माहिती घेण्यासाठी ब्रिच कँडी (Breach Candy) रुग्णालयातील डॉक्टरांबरोर बोलून राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली आहे. देशभरात लतादिदींचा मोठा चाहतावर्ग असून त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून अनेक जण प्रार्थना करत आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या चाहत्यांकडून त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या लतादिदींच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होत असून त्या लवकरच बऱ्या होतील अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
लता मंगेशकर यांच्या तब्बेतीबाबत माहिती घेण्यासाठी राजेश टोपे यांनी लतादिदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना फोन करून त्यांनी त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली. याआधी त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते, मात्र आता त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याने त्यांचे व्हेटिंलेटर काढले आहे. त्या आता स्वतःच श्वासोश्वास घेत आहेत. त्यांच्या शरीरामध्ये सध्या प्रचंड अशक्तपणा असून त्यांना इन्फेक्शनचा थोडा त्रास होत आहे. त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होण्यासाठी देशभरातील त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येत असून लतादिदींनी आता उपचाराला प्रतिसाद दिला आहे. मागील काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
लता मंगेशकर यांच्या ट्वविटरवर हँडलवरून 27 जानेवारीला त्यांच्या चाहत्यांना सांगण्यात आले होते की, त्यांच्या तब्बेतीत हळूहळू सुधारणा होत असून त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. त्यावेळी त्यांना लावण्यात आलेला व्हेंटिलेटरही काढण्यात आले होते. त्यांची काळजी घेण्यासाठी डॉ. प्रतीत सामदानी आणि त्यांची टीम काम करीत आहे.
गानसम्राज्ञी म्हणून जगभर ओळख असणाऱ्या लतादिदी यांच्या तब्बेत नाजूक झाल्यानंतर त्यांच अनेक चाहते नाराज झाले. त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. तर दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर त्यांच्या आरोग्याबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जात होत्या. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नाक असे आवाहन केले.
लता मंगेशकर यांच्या आरोग्याबाबत काही जण चुकीच्या बातम्या पसरवत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या चाहत्यावर्गाला सांगितले की, लतादिदी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्या हळूहळू उपचाराला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरून आणि अन्य ठिकाणाहून पसरणाऱ्या गोष्टींवर चाहत्यावर्गांनी विश्वास ठेवू नये.
संबंधित बातम्या