मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं आहे. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) उपचार सुरु शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं आज सकाळी 8.12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना आणि न्यूमोनिया झाल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 28 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना सुरु आहेत. डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ. प्रतीत समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. लता मंगेशकर या कोरोना आणि न्यूमोनियातून मुक्त झाल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
सुभाष देसाई यांचीही उद्याची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.
संजय राऊत उद्या सायंकाळी दिल्लीत जातील.
Mortal Remains of singer Lata Mangeshkar consigned to flames with full state honours, at Shivaji Park, Mumbai pic.twitter.com/a7vYdVUQm1
— ANI (@ANI) February 6, 2022
लतादिदी अनंतात विलीन
छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये झाले अंत्यसंस्कार
मोदींनी विहीली आदरांजली
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपालही होते उपस्थित
बॉलिवूडमधील दिग्गजांचीही उपस्थिती
#WATCH | State honour being given to veteran singer Lata Mangeshkar at Mumbai’s Shivaji Park
(Source: DD news) pic.twitter.com/9fMvwyT9W6
— ANI (@ANI) February 6, 2022
#WATCH | Cricketer Sachin Tendulkar and actor Shah Rukh Khan pay last respect to veteran singer Lata Mangeshkar at Mumbai’s Shivaji Park pic.twitter.com/r22Njpi4XW
— ANI (@ANI) February 6, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर,आमदार सुनील प्रभू आदींनी देखील लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
लतादिदींना शाहरुख खानने श्रद्धांजली वाहिली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते मात्र मुख्यमंत्र्यांना बघताचं फडणवीस उठले आणि मुख्यमंत्र्यांना मोदींशेजारी जागा दिली
पंतप्रधान मोदी आदरांजली वाहून निघाले
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पोहोचले
राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, मिताली ठाकरे हे पोहोचले
रश्मी ठाकरे, सचिन तेंडुलकर, मुलगा आणि पत्नी पोहोचले
उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे अंत्यदर्शनासाठी पोहोचत आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा मुंबई विमानतळावरुन निघाला
दीदींच्या अखेरचा प्रवास
पार्थिव पार्कमध्ये पोहोचले
संध्याकाळी साडे सहाला अंत्यसंस्कार
अंत्यविधीला पीएम मोदी उपस्थित राहणार
सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी दाखल
सर्वसामान्य नागरिक रांगेत शिवाजी पार्क मैदानात सोडायला सुरुवात
10 मिनिटात छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पार्थिव पोहचणार
अंत्यसंस्काराची जागा फुलांनी सजवली
तिन्ही दलाचे जवान मानवंदना देण्यासाठी मैदानात हजर
राज्यपाल मुबंई विमानतळावर दाखल
मुख्यमंत्री सायंकाळी 5.15 वाजता अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क येथे पोहचत आहेत
मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
विशेष विमानाने पोहचणार
छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
मिनाताई ठाकरे स्मृती मार्गापासून पार्कपर्यंत जाणारा रस्ता बंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 वाजता शिवाजी पार्कवर दाखल होणार
व्हीव्हीआयपी व्यक्ती दाखल होणार असल्याने विशेष खबरदारी
सव्वातीन वाजता पंतप्रधान मोदी रवाना होणार
5:45 वाजता पंतप्रधान मोदी शिवाजी पार्कवर पोहोचणार
सव्वा 6 वाजता होणाऱ्या अंत्यसंस्कारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर उपस्थित राहणार
विशेष विमानाने नवी दिल्लीतून काही वेळात पंतप्रधान मोदी मुंबईला रवाना होणार
Will be leaving for Mumbai in some time to pay my last respects to Lata Didi.
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2022
भारतीय संगीत क्षेत्र नाही तर विश्वातील संगीत क्षेत्राचं नुकसान
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले भावूक
अंत्यदर्शनाला जाऊ शकत नाही हे दुर्भाग्य
हे नुकसान कधीही न भरून येणार
लतादीदी अजरामर आहेत, शतकानुशतके जोपर्यंत जगात संगीत आहे तोपर्यंत लतादीदींना कुणीही विसरु शकणार नाही
गेल्या दीड दोन महिन्यांपूर्वी आजारी होतो, त्यावेळी लता मंगेशकर यांचा दोन दोन दिवसानंतर फोन यायचा, त्या विचारपूस करायच्या
लता मंगेशकर यांच्या जाण्याने भारत देशा बरोबर सर्व विश्वाला दुःख झाले आहे. लता मंगेशकर आज जरी आपल्यामध्ये नसल्या तरी त्या स्वरांच्या माध्यमातून आपल्या आठवणीत राहतील. लता दिदींच्या जाण्याने सर्व देश हळ हळ व्यक्त करत असल्याच्या भावना व्यक्त करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लता दिदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
लता मंगेशकर यांच्या निधनामुळं दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या निधनामुळं मंत्रालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.
1ST ODI. India won the toss and elected to field. https://t.co/VNmt1OWHVg #INDvWI
— BCCI (@BCCI) February 6, 2022
Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांचं पार्थिव प्रभुकुंज निवासस्थानी नेण्यात येत आहे. पेडर रोडवरील लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोडया वेळात ‘प्रभुकुंज’ जाणार.
सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज मैदानातही जाण्याची दाट शक्यता
शरद पवार सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात जाणार
ब्रीच कँडी रुग्णालयातून लता मंगेशकर यांचं पार्थिव निवसास्थानी नेण्यात येणार आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयातून पार्थिव रुग्णवाहिकेतून पेडररोडवरील प्रभुकुंज येथील निवासस्थानी नेण्यात येईल.
आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवाजी पार्कवरील तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. ते शिवाजी पार्कवरील महापालिकेकडून सुरु असलेल्या कामाचा आढावा घेत आहेत. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे त्यांना माहिती देत आहेत.
भारतरत्न लता मंगेशकर यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क मैदानात तीन तास ठेवण्यात येणार आहे
त्यानंतर विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांना राजकीय सन्मानाने त्यांना मुंबई पोलीस दलात मार्फत तसेच भारतीय लष्करा कडून शासकीय इंतमामान सलामी देण्यात येणार त्यामध्ये वीस पोलीस कर्मचारी सामील होतील 5 अधिकारी 2 बिगलुर तसेच 3 राऊंड हवेत फायर केले जाणार आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावणार आहेत. मुंबईत 4.30 वाजता ते पोहोचतील अशी माहिती आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांनी काल रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारणा केली होती.
लता मंगेशकर यांचं पार्थिव 12.15 वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी नेण्यासाठी बाहेर नेण्यात येईल. 12.30 ते 3 पर्यंत त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. लतादिदींवर मुंबईतल्या शिवाजीपार्कवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
प्रत्येक स्वर ऐकणार्या, गाणार्या,गुणगुणणा-यांनाच नव्हे तर अगदी आसमंतातील स्वरांच्या अणू-रेणूंना ही प्रभावित करणारा तो मंजुळ पवित्र आवाज,सोज्वळ भाव, जरीकाठी साड़ी,अंगभर पदर,लोभस हसरा चेहरा काळाआड गेला तरी नजरेआड जात नाही”आदरांजली” लता दीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील,मनात देखील!!
प्रत्येक स्वर ऐकणार्या, गाणार्या,गुणगुणणा-यांनाच नव्हे तर अगदी आसमंतातील स्वरांच्या अणू-रेणूंना ही प्रभावित करणारा तो मंजुळ पवित्र आवाज,सोज्वळ भाव,
जरीकाठी साड़ी,अंगभर पदर,लोभस हसरा चेहरा काळाआड गेला तरी नजरेआड जात नाही”आदरांजली” लता दीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील,मनात देखील!!— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 6, 2022
महाराष्ट्राच्या मातीला संगीत कलेचा वारसा
लतादिदींनी भारतीय संगीत क्षेत्रात जो चमत्कार घडवला तो 75 ते 80 वर्ष अनेक पिढ्यांनी पाहिला
आज दु:खद बातमी आपल्याला समजली
लता मंगेशकर या भारतीय आणि जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न
28 स्वरांच्या दुनियेत त्यांनी संगीताचे अविष्कार घडवले
22 भाषांमध्ये त्यांनी गायन केले
अद्वितीय ओळख त्यांनी निर्माण केली
1962 च्या चीनच्या युद्धातील जवानांना आदरांजली देताना ऐ मेरे वतन के लोगो हे गाणं गायलं त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना देखील अश्रू अनावर झाले होते
आम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत
मुख्यमंत्र्यांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिलेत
प्रियांका गांधी यांच्याकडून ट्विटद्वारे आदरांजली
भारतीय संगीत की बगिया में सुरों को चुन-चुन कर सजाने वाली सुर साम्राज्ञी सुश्री लता मंगेशकर जी के निधन का दुखद समाचार मिला।
उनके निधन से भारतीय कला जगत को एक अपूर्णीय क्षति हुई है।
ईश्वर लता जी को श्री चरणों में स्थान दें और इस दुःख की घड़ी में परिजनों को कष्ट सहने का साहस दें। pic.twitter.com/feYZ3hTUuY
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 6, 2022
लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे.
ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील.
लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं?
लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत. लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन 4 ते 6 दरम्यानासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसस्कार
4 ते 6 वाजेदरम्यान अंत्यदर्शन
साडे सहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
“‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम, ये मंजिलें हैं कौनसी…? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादीदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीतविश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे. लतादीदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादीदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादीदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादीदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही… अशा लतादीदी आता पुन्हा होणे नाही…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गानकोकीळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लता मंगशेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
“लतादीदी अमर आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ कधीच येणार नाही हा भाबडा समज आज खोटा ठरला आहे,” असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीला संगीतकलेचा गौरवशाली वारसा आहे. महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादीदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला. अठ्ठावीस सूरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादीदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी दिली. संगीतक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवलं. ‘अद्वितीय’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. भारतीय, जागतिक संगीतक्षेत्र समृद्ध केलं. देव आणि स्वर्ग आहेत की नाही ते माहित नाही, परंतु लतादीदींमध्ये अनेकांनी देव पाहिला. त्यांच्या सूरांनी रसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभूती दिली. लतादीदींनी सामाजिक बांधिलकीही जाणीवपूर्वक जपली.
1962 च्या चीनविरुद्धच्या युद्धात शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ त्यांनी गायलेल्या ‘मेरे वतन के लोगो…’ गाण्यानं तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पंडित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील. विश्वरत्न, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लतादीदी महाराष्ट्रकन्या होत्या. त्यांचं निधन ही महाराष्ट्राची, देशाची फार मोठी हानी आहे. लतादीदींचं नसणं कायम सलत राहील, मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव त्यांची आठवण देत राहतील. मी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खद प्रसंगात मी आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबियांसोबत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
आज जीवन पोरकं झाल्यासारखं वाटत, पांडुरंगाला विठू माऊली म्हणतो तसं लता मंगेशकर या आमच्यासाठी स्वरमाऊली होत्या : राहुल देशपांडे
स्वरसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न लतादीदी यांच्या निधनाने भारतीयांसह जगातील असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपल्याची शोकभावना माज़ी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
लता मंगेशकर नावाचं पर्व आज संपलं. त्यांच्या जाण्याने आज भारत पोरका झाला. मात्र त्यांचा आवाज कायम या जगात राहिल. दुपारी 12 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. लतादिदींवर मुंबईतल्या शिवाजीपार्कवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
लता मंगेशकर यांच्या निधनानं पोकळी निर्माण झालीय : अमृता फडणवीस
Heartfelt tributes to the Immortal Pride of India – The Nightingale of India – she has left a huge vaccum in our hearts !
May her soul Rest In Peace ?#omshanti #LataMangeshkar— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 6, 2022
अमित शाह यांच्याकडून आदरांजली
सुर व संगीत की पूरक लता दीदी ने अपनी सुर साधना व मंत्रमुग्ध कर देने वाली वाणी से न सिर्फ भारत बल्कि पूरे विश्व में हर पीढ़ी के जीवन को भारतीय संगीत की मिठास से सराबोर किया।
संगीत जगत में उनके योगदान को शब्दों में पिरोना संभव नहीं है।
उनका निधन मेरे लिए व्यक्तिगत क्षति है। pic.twitter.com/uRwKwZa4KG
— Amit Shah (@AmitShah) February 6, 2022
जी बातमी येऊ नये ती आली. कालपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. असंख्य गाण्यांच्या स्वरुपात त्या आपल्यात आहेत. गाण्यांच्या रुपात त्या आपल्यासोबत आहेत. लता मंगेशकरांची 70 ते 75 वर्षांची कारकीर्द होती. जगात एकही क्षण असा जात नाही. ध्वनी लहरीत त्यांचा आवाज सुरु असतो.
लतादीदी यांच्या पूर्वी आणि त्यांच्यानंतर लता मंगेशकर यांच्यासारखं कोण होऊ शकेल, असं वाटत नाही. लता मंगेशकर यांचं युग 1940 पासून सुरु झालं होतं. ते आजही सुरु होतं. लता मंगेशकर यांनी संगीत क्षेत्रात केलेल्या कामासारखं काम दुसरं कोण करु शकत नाही. माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीला मी संगीत क्षेत्रातील एका जाणकारांना विचारलं होतं. क्लासिकल आणि नॉन क्लासिकल सिंगर मानतात. लतादिदी या नेहमी सेंटरला गायच्या. लतादीदी जे गायच्या त्याच्या शब्दांची जाणीव होती. शब्दाची भावना समजून आपलं बनवून त्या गात होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आदरांजली
I am anguished beyond words. The kind and caring Lata Didi has left us. She leaves a void in our nation that cannot be filled. The coming generations will remember her as a stalwart of Indian culture, whose melodious voice had an unparalleled ability to mesmerise people. pic.twitter.com/MTQ6TK1mSO
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2022
आज सकाळी 8.12 वाजता लता मंगेशकर यांचं निधन झालं.
मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळं त्यांचं निधन झालं
कोरोना झाल्यानंतर उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर 28 दिवस उपचार सुरु होते.
जगाला मंत्रमुग्ध करणारा आवाज हरपला : एकनाथ खडसे
जगाला मंत्रमुग्ध करणारा आवाज हरपला. #Didi
— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 6, 2022
– देशाच्या दृष्टीने अत्यंत दुखद घटना
– लता दीदी नावाच्या युगाचा अंत
– देशाची कधी भरून न निघणारी पोकळी
– संगीत क्षेत्रातील मन सुन्न झाले
लतादीदी या संगीत युगाचा इतिहास होता. त्यांनी संगीताच्या माध्यमातून भारताचा नाव जगात पोहोचवलं. त्यांनी अनेक भाषांमध्ये गायन केलं. त्यांच्या निधनानं देशाची आणि संगीत क्षेत्राची हानी झाली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई, गोवा आणि संस्कृतीसाठी त्या जोडलेल्या होत्या. त्या आपल्यामध्ये नाहीत. पण, त्यांचं संगीत आणि त्यांनी गायलेली गाणी आपल्यासोबत असतील. त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो. त्या आमच्या देशाच्या अभिमान होत्या. संगीत आणि गायनाच्याद्वारे देशाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून दिला. त्यांनी 75 ते 80 व्या वर्षी आवाज दिला तरी तो 20 वर्षाच्या मुलीच्या आवाजासारखं त्यांचा आवाज वाटायचा. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी त्यांचा संबंध होता. लतादीदी यांचा आधार आम्हाला होता.
देश की शान और संगीत जगत की शिरमोर स्वर कोकिला भारत रत्न लता मंगेशकर जी का निधन बहुत ही दुखद है। पुण्यात्मा को मेरी भावभीनी श्रद्धांजलि। उनका जाना देश के लिए अपूरणीय क्षति है। वे सभी संगीत साधकों के लिए सदैव प्रेरणा थी।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 6, 2022
जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील, अशा शब्दात शरद पवार यांनी लतादीदींबद्दल भावना व्यक्त केल्या.
जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले.
लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/U9Nhn1KrpE— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 6, 2022
भारताची शान निघून गेली. भारताचा आवाज गेला. कोणत्या शब्दात बोलू हे मला समजत नाही. दीदींना भारतातील आणि जगातील कोणताही माणूस विसरु शकत नाही, असं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं आहे. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) उपचार सुरु शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. कोरोना आणि न्यूमोनिया झाल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.