लावणी डान्सर गौतमी पाटीलचे (Gaurami Patil) हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आपल्या भन्नाट डान्सने सर्वांना स्वतःच्या तालावर थिरकायला लावणारी गौतमी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील गौतमी पाटील हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये गौतमी सर्वांसमोर दादूस म्हणजेच अरुण कदम यांच्या पाया पडताना दिसत आहे. सध्या गौतमी पाटील आणि अरुण कदम यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सांगायचं झालं तर, अरुण कदम आणि गौतमी पाटील यांचे फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. गौतमी पाटील तिच्या डान्समुळे चाहत्यांचं मनोरंजन करते. तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ विनोदी कार्यक्रमात अरुण कदम विविध पात्र साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.
अरुण कदम अनेक कार्यक्रमांसाठी देखील हजेरी लावत असतात. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात गौतमी पाटील आणि अरुण कदम एकाच मंचावर होते. तेव्हा अरुण कदम यांना पाहताच गौतमी पाटील त्यांच्या पाया पडली. या भेटीचा व्हिडीओ गौतमी पाटील हिने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
व्हिडीओ पोस्ट करत गौतमी हिने कॅप्शनमध्ये, ‘कॉमेडी किंग, लाडका दादूस अरुण कदम…’ असं लिहिलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी गौतमी पाटील हिचं कौतुक केलं आहे. व्हिडीओमध्ये अरुण कदम दिसताच गौतमी पाटील त्यांच्या पाया पडते. त्यानंतर अरुण कदम सेल्फी घेण्यासाठी फोन पुढे करतात. तेव्हा गौतमी स्वतःच त्यांच्यासोबत सेल्फी घेते… सध्या सर्वत्र गौतमीने पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
गौतमीच्या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘गौतमी संस्कार जपणारी आहे, विनाकारण तिच्यावर टीका केली जाते.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘एक मोठा कलाकार स्वतःहून सेल्फी मागतो ही आपल्या कामाचा पोचपावती आहे.’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘वरिष्ठ कलाकारांना आदर द्यायचा कळतं तिला म्हणून ती सुद्धा आज मोठी कलाकार आहे…’ सध्या गौतमी हिची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकताच येवला याठिकाणी कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात गौतमी पाटील आणि अरुण कदम यांना बोलावण्यात आलं होतं. त्याच कार्यक्रमातील दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.