Baba Siddique Case: देश सध्या नव्या उभरत्या गुंडांना पाहात आहे. ज्यांचं नाव लॉरेन्स बिश्नोई असून तो तुरुंगात राहून धमकी आणि हत्या यांसाऱ्या गंभीर गुन्हे प्रत्येक्षात आणताना दिसत आहे. सध्या देशात जे काही सुरु आहे, त्यामागे एकट्या लॉरेन्स बिश्नोई याचा हात नसून इतर लोकं देखील त्याच्यासोबत गुन्हेगारी विश्वात सक्रिय आहेत. लॉरेन्सचा मित्र, गुर्गे आणि त्याचा धाकटा भाऊ, या सर्वांनी मिळून लॉरेन्सच्या गुन्हेगारी विश्वाचा विस्तार केला आहे. लॉरेन्स आणि त्याचा लहान भाऊ अनमोल यांनी थेट बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आपला शत्रू मानलं आहे.
लॉरेन्स आणि अनमोल आता अशा लोकांनाही टार्गेट करत आहेत जे सलमान खानच्या जवळ आहेत किंवा त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करत आहेत. सांगायचं झालं तर, बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांचे देखील मैत्रीपूर्ण संबंध होते. याच कारणामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
शनिवारी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई याने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वीकारली. याआधी सलमान खानसोबत सिनेमात दिसलेल्या एपी ढिल्लोच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. एवढंच नाही तर, काही महिन्यांपूर्वी सलमान खान याच्या घरावर देखील गोळीबार करण्यात आला.
गोळीबार केल्यानंतर घटनेची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली होती. ‘ये सिर्फ ट्रेलर है’ असं म्हणत लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ अनमोल याने सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. सिद्धू मूसेवाला याच्या हत्येची जबाबदारी देखील अनमोल याच्यावर आहे. सिद्धूच्या हत्येनंतर अनमोल अझरबैजानला पळून गेला होता. तो अखेरचा अमेरिकेत एका लग्नादरम्यान दिसला होता.
देशात सध्या हाय प्रोफाईल मर्डर केसमध्ये लॉरेन्स बिश्नोई याचं नाव सतत समोर येत आहे. याच वर्षी गोगामेडी हत्याकांडमध्ये देखील लॉरेन्सचं नाव समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स याच्या गँगमध्ये 1000 पेक्षा अधिक शुटर्स आहेत. त्याचं साम्राज्य देशातील 11 राज्यांमध्ये आहे. एवढंच नाही तर, 6 देशांमध्ये बॉश्नोई गँगची दहशत आहे.
लॉरेन्स बिश्नोई याने सर्वांसमोर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला आव्हान दिलं आहे. लॉरेन्सला आता मायानगरीवर राज्य करायचे आहे. लॉरेन्सला बॉलिवूडमध्ये स्वतःची दहशत निर्माण करायची आहे आणि त्याचे साम्राज्य आणखी वाढवायचं असल्याची माहिती देखील समोर येत आहे.