Salman Khan: सलमान प्रकरणापासून दूर राहा, नाही तर तुझी पण हत्या करेल… अशी धमकी आता गुंड लॉरेन्स बिश्नोई याने थेट एका खासदाराला दिली आहे. लॉरेन्सने ज्या खासदाराला धमकी दिली आहे त्यांचं नाव खासदार पप्पू यादव असं आहे. बिहारच्या पूर्णिया येथील खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धमकी लॉरेन्स बिश्नईने दिली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. कॉल करून धमकी देणारी व्यक्ती पप्पू यादव यांच्या ठिकाणींची रेकी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
एवढंच नाही तर, पप्पू यादव यांना सलमान खान याच्या प्रकरणापासून दूर राहा.. असं चेतावनी देखील देण्यात आली आहे. पप्पू यादव यांनी बिहारच्या डीजीपीला या प्रकरणाची माहिती दिली जेणेकरून त्यावर कारवाई करता येईल. धमकी देणाऱ्या व्यक्तीने आणखी एक धक्कादायक दावा केला आहे.
लॉरेन्स बिश्नोई तासाला एक लाख रुपये देऊन जेलमध्ये जॅमर बंद करून पप्पू यादवशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र पप्पू यादव फोन उचलत नाहीत…. असा धक्कादायक दावा धमकी देणाऱ्या व्यक्तीने केला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
सांगायचं झालं तर, ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पप्पू यादव यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला खुलं आव्हान दिलं. ‘कायद्याने परवानगी दिली तर 24 तासांत लॉरेन्स बिश्नोई सारख्या गुन्हेगारांचं संपूर्ण नेटवर्क नष्ट करेल…’ असं पप्पू यादव म्हणाले होते. सध्या सर्वत्र पप्पू यादव यांना आलेल्या धमकीची चर्चा रंगली आहे.
ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर तीन जणांनी गोळीबार करत बाबा सिद्दीकी यांची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप 10 आरोपींना अटक केली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर संपूर्ण प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर काही तासांत लॉरेन्स बिश्नोई याने जबाबदारी स्वीकारली. सोशल मीडियावर एक पोस्ट करत लॉरेन्स यांने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सलमान खान याची कोणी मदत केल्यास, त्याने स्वतःता हिशेब करून ठेवावा… अशी धमकी देखील सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोई याने दिली आहे.