मुंबई : झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आयु्ष्यामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडच्या अभिनेत्री आणि खेळाडू यांचं फार जुनं नातं आहे. जगातील महान टेनिसपटूंच्या पैकी एक म्हणजे भारताचे माजी टेनिसपटू लिएंडर पेस. लिएंडर पेस देखील त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आले. खेळाडू म्हणून त्यांनी जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली. पण खासगी आयुष्यात त्यांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा हिच्यासोबत असलेलं दोन वर्षांचं नातं तुटल्यामुळे लिएंडर पेस सध्या तुफान चर्चेत आले आहेत. किम शर्मा हिच्या आधी अनेक अभिनेत्रींसोबत लिएंडर पेस यांचं नाव जोडण्यात आलं.
अनेक अभिनेत्रीसोबत खास कनेक्शन असलेले लिएंडर पेस लग्नाआधी पती झाले, ज्यामुळे ते चर्चेत आले होते. लिएंडर पेस आणि रिया पिल्लई दोघे अनेक वर्ष लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होते. २००३ दरम्यान लिएंडर पेस आणि रिया पिल्लई यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. तेव्हा रिया पिल्लई अभिनेता संजय दत्त याची पत्नी होती. पण २००५ साली रिया आणि संजय यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
संजय दत्त याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर लिएंडर पेस आणि रिया पिल्लई यांनी लग्न केलं नाही. २००५ साली दोघांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला. तेव्हा रिया पिल्लई प्रेग्नेंट होती. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण काही वर्षांनंतर रिया हिने २०१४ मध्ये लिएंडर यांच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. हे प्रकरण अनेक वर्ष कोर्टात सुरु होतं. त्यानंतर लिएंडर पेस आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं.
रियासोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी लिएंडर पेस बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी हिला डेट करत होते. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. अखेर महिमा चौधरी हिने लिएंडर पेस यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडल्यानंतर लिएंडर पेस यांचं नाव अभिनेत्री किम शर्मा हिच्यासोबत जोडलं जावू लागलं. सोशल मीडियावर दोघांचे अनेक रोमाँटिक फोटो देखील आहेत. २०२१ मध्ये किम हिने फोटो शेअर सर्वांसमोर नात्याची कबूली दिली. पण दोन वर्षांनंतर किम आणि लिएंडर पेस यांचे मार्ग वेगळे झाले आहेत.