माजी मुख्यमंत्र्यांच्या सूनचं खडतर आयुष्य, लग्नाच्या 11 दिवसांनंतर नवऱ्याला लगली गोळी, 11 महिन्यांनंतर झाली विधवा

| Updated on: Oct 14, 2024 | 1:20 PM

Bollywood Actress Life: प्रसिद्ध अभिनेत्रीचं वेदनादायी आयुष्य.... माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलासोबत केलं लग्न, पण गोळी लागल्यामुळे नवऱ्याचं लग्नाच्या 11 महिन्यांनंतर निधन... नवऱ्याच्या निधनानंतर अनेकांनी अभिनेत्रीला मारले टोमणे...

माजी मुख्यमंत्र्यांच्या सूनचं खडतर आयुष्य, लग्नाच्या 11 दिवसांनंतर नवऱ्याला लगली गोळी, 11 महिन्यांनंतर झाली विधवा
Follow us on

Bollywood Actress Life: अभिनेता गोविंदा याच्या पायाला ज्याप्रमाणे गोळी, तशीच गोळी काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याला लागली होती. तेव्हा अभिनेत्रीच्या लग्नाला फक्त 11 दिवस झाले होते. गोळी लागल्यानंतर अभिनेत्रीच्या पतीवर उपचार करण्यात आले. जवळपास 11 महिने उपचार सुरु होते. पण लग्नाच्या 11 महिन्यांनंतर अभिनेत्रीच्या पतीचं निधन झालं. पतीच्या निधनानंतर अभिनेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती, अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, लीना चंदावरकर आहे. लीना चंदावरकर यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

लीना चंदावरकर यांनी 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मन का मीत’ सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं. सिनेमात लीना चंदावरकर यांच्यासोबत अभिनेते विनोद खन्ना मुख्य भूमिकेत होते. पहिल्या सिनेमात काम केल्यानंतर लीना यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण करत असताना लीना यांनी 1984 मध्ये सिद्धार्थ बंदोदकर यांच्यासोबत लग्न केलं.

लीना यांनी वयाच्या 24 व्या वर्षी लग्न केलं. सिद्धार्थ बंदोदकर हे राजकारणी कुटुंबातील होते. त्यांचं वडील दयानंद बंदोदकर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री होते. लीना यांनी लग्नानंतर मनोरंजन विश्वाचा निरोप घेतला होता. पण लग्नाच्या 11 व्या दिवशी लीना यांच्या पतीच्या पायाला चुकून गोळी लागली. सिद्धार्थ बंदोदकर यांच्यावर तब्बल 11 महिने उपचार सुरु होते. पण लग्नाच्या 11 महिन्यांनंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे सुद्धा वाचा

वयाच्या 24 व्या वर्षी लग्न झाल्यानंतर 25 व्या वर्षी लीना चंदावरकर यांच्या पतीचं निधन झालं. पतीच्या निधनाला चंदावरकर यांना जबाबदार ठरण्यात आलं. कुटुंबियांनी देखील लीना चंदावरकर यांना टोमणे मारले. अखेर सर्वकाही विसरून लीना चंदावरकर यांनी पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात केली.

लीना चंदावरकर यांनी पुन्हा झगमगत्या विश्वात पदार्पण केलं. दिवंगत अभिनेते किशोर कुमार स्टारर ‘बैराग’ सिनेमातून त्यांनी अभिनयाची पुन्हा सुरुवात केली. किशोर कुमार यांच्यासोबत काम करत असताना दोघांमध्ये प्रेम बहरलं. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. किशोर – लीना यांच्यामध्ये 20 वर्षांचा अंतर होता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लीना, किशोर यांच्या चौथ्या पत्नी होत्या.