चुन्यामुळे मुलीने लहानपणी गमावले डोळे, सोनू सूदच्या वैद्यकीय मदतीमुळे मिळालं नवं आयुष्य

| Updated on: Dec 02, 2024 | 1:02 PM

Sonu Sood: 'सोनू सूद यांचं देव भवं करो...', अनेक वर्षांनंतर मुलीला पुन्हा मिळाली दृष्टी, चुन्यामुळे लहानपणी गमावले होते डोळे, सोन सूद कायम गरजूंच्या मदतीसाठी होतो पुढे... आता देखील अभिनेत्याने मुलीसाठी उचललं मोठं पाऊल...

चुन्यामुळे मुलीने लहानपणी गमावले डोळे, सोनू सूदच्या वैद्यकीय मदतीमुळे मिळालं नवं आयुष्य
Follow us on

Sonu Sood: जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला होता. कोरोना काळात अनेक जण एकमेकांच्या मदतीसाठी पुढे आहे. तर बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने तर असंख्या लोकांना कोरोना काळात मदत केली. कोरोना काळात उपचारापासून पदार्थ देण्यापर्यंत सर्वच जबाबदारी अभिनेत्याने उचलली. निराधारांसाठी आपल्या घराचे दरवाजे उघडले. असंख्य लोकांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या सोनू सूदने आता देखील एका मुलीची मदत केली आहे. सोनू सूद याच्या मदतीतमुळे मुलीला पुन्हा दृष्टी मिळाली आहे.

देशभरातीव गरीबांना मदत करणारा म्हणून ओळख असलेल्या अभिनेता सोनू सूदच्या मदतीमुळे कोपरगाव शहरातील गायत्री थोरात या मुलीला गमावलेली दृष्टी पुन्हा परत मिळाली आहे.. गायत्रीच्या जीवनातील अंधकार दूर झाला असून तिच्या जीवनात नवा दिवस पुन्हा उजाडला आहे.

हे सुद्धा वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे राहणाऱ्या गायत्री दशरथ थोरात अडीच वर्षांची असताना तिच्या डोळ्यात चुना गेल्यामुळे डावा डोळा पूर्ण निकामी झाला होता. तर उजव्या डोळ्याने पुसटसं दिसत होतं. आपल्याला जन्मभर असंच राहावं लागणार याची खंत असताना सोनू सुद मदतीला धावून आला..

कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्षे यांच्या पुढाकाराने आणि अभिनेता सोनू सूद यांच्या मदतीमुळे महागडी शस्त्रक्रिया करून गायत्री हिला गेलेली दृष्टी पुन्हा मिळाली आहे. गायत्रीला दृष्टी मिळावी यासाठी तिचे वडील दशरथ आणि भाऊ कार्तिक थोरात यांनी खूप प्रयत्न केले मात्र शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च असल्याने गायत्रीचे उपचार थांबले होते. सोनू सुदच्या उदारतेमुळे गायत्रीच्या जिवनात नवा सुर्योदय झालाय..

गायत्रीने अभिनेत्याने मानले आभार

शस्त्रक्रिया होताच पुन्ही दिसू लागल्यानंतर गायत्री हिने सोनू सूद यांचे आभार मानले. ‘त्यांच्यामुळे मला दृष्टी मिळाली आहे. त्यांनी केलेली मदत कधीच विसरणार नाही. त्यांचे आभार मानते. त्यांचे आभार मानन्यासाठी शब्द अपुरे आहेत… एवढंच बोलेल की देव त्याचं भलं करो…’ गायत्री हिची मदत केल्यामुळे सर्वत्र अभिनेत्याचं कौतुक होत आहे.