पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील गाभाऱ्यातून प्रेक्षकांना मिळणार कीर्तनाचा आनंद

| Updated on: Jun 12, 2022 | 11:00 AM

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच झी टॉकीजच्या माध्यमातून थेट पंढरपूरातील श्री विट्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील गाभाऱ्यातून हा कीर्तन सोहळा रंगणार आहे.

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील गाभाऱ्यातून प्रेक्षकांना मिळणार कीर्तनाचा आनंद
झी टॉकीजची आषाढवारीची विशेष भेट
Image Credit source: Tv9
Follow us on

‘पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. आषाढ महिन्याची सुरुवात झाली की, विठूरायाच्या भक्तांना पंढरीचे वेध लागतात. पंढरपूरच्या (Pandharpur) या वारीची अनुभूती प्रेक्षकांना आता घरबसल्या मिळणार आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी अणि भक्तांसाठी झी टॉकीजने आषाढवारीची (Wari) विशेष भेट आणली आहे. ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंढरपुरातील श्री विट्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील गाभाऱ्यातून थेट कीर्तनाचा आस्वाद घेता येणार आहे. ‘गजर कीर्तनाचा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून आजवर अनेक कीर्तनकारांनी कीर्तनाच्या (Kirtan) माध्यमातून निरुपण केले आहे. गेली पाच वर्षे सातत्याने भक्ती आणि प्रबोधनाचा आगळा मेळ साधत झी टॉकीजने या कार्यक्रमाद्वारे आपल्या प्रेक्षकांच्या दिवसाची सुरुवात आध्यात्मिक व मंगलमय करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. आता या अनोख्या संकल्पनेद्वारे प्रेक्षकांसाठी विठ्ठल भेटीचा मार्ग अधिक प्रशस्त केला आहे.

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच झी टॉकीजच्या माध्यमातून थेट पंढरपूरातील श्री विट्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील गाभाऱ्यातून हा कीर्तन सोहळा रंगणार आहे. ‘आषाढ वारी’ आणि ‘आषाढ एकादशी’ या दोन विशेष दिनाचे औचित्य साधत ह.भ.प शंकर महाराज शेवाळे यांचे कीर्तन रंगणार आहे. ह.भ.प शंकर महाराज शेवाळे यांनी याआधी श्री तुकाराम महाराज कथा, श्री विट्ठल कथा यांचे निरूपण सादर करत प्रेक्षकांना भक्तीची भावपूर्ण अनुभूती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

‘आषाढ वारी’ आणि ‘आषाढ एकादशी’ या दोन विशेष दिनाचे औचित्य साधून झी टॉकीजवर सोमवार 20 जूनला सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत तर शनिवार 10 जुलैला सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत हा अनोखा कीर्तन सोहळा प्रक्षेपित होणार आहे.