दोघे लग्न का नाही करत? सलमान खानला ‘त्या’ महिलेच्या कुटुंबियांसोबत पाहताच चर्चांचा उधाण

| Updated on: Dec 08, 2024 | 10:59 AM

Salman Khan Love Life: सलमान खान याच्या आयुष्यातील 'ती' खास महिला, तिच्या कुटुंबियांसोबत भाईजानचे फोटो तुफान व्हायरल, चाहते म्हणाले, 'दोघे लग्न का नाही करत...?', सध्या सर्वत्र चर्चांना उधाण...

दोघे लग्न का नाही करत?  सलमान खानला त्या महिलेच्या कुटुंबियांसोबत पाहताच चर्चांचा उधाण
Follow us on

Salman Khan Love Life: बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सध्या सलमान खान याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये सलमान एक महिला आणि तिच्या कुटुंबियांसोबत आनंदी दिसत आहे. सलमान खान याच्यासोबत ज्या महिलेचे आणि तिच्या कुटुंबियांचे फोटो व्हायरल होत आहेत, ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून लुलिया वंतूर (Iulia Vantur) आहे. खुद्द लुलिया हिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान आणि लुलिया वंतूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. आता देखील असं काही झालं ज्यामुळे सलमान – लुलिया यांच्या लग्नाची चर्चा रंगू लागली. लुलिया हिच्या वडिलांच्या वाढदिवशी सलमान खान देखील त्यांच्यासोबत होता.

हे सुद्धा वाचा

वडील आणि सलमान यांच्यासोबत फोटो पोस्ट करत लुलिया कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘हॅप्पी बर्थडे डॅड…. आय लव्ह यू आणि माझ्या दोन हिरोंना धन्यवाद…’ शिवाय लुलिया हिने पुढे हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त लुलिया हिने शेअर केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

 

 

सलमान खान याला लुलिया हिच्या कुटुंबियांसोबत पाहिल्यानंतर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘सलमान खान नात्याची अधिकृत घोषणा का करत नाही…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुम्ही दोघे लग्न का करत नाही…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘सोबत किती चांगले दिसत आहेत…’

सलमान खान – लुलिया वंतूर

सलमान खान आजही एकटं आयुष्य जगत आहे. पण सध्या लुलिया वंतूर हिच्यासोबत सलमान खान याच्या नावाची तुफान चर्चा रंगलेली असते. तिचं नाव कायम सलमान याच्यासोबच जोडण्यात आलं. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

रिपोर्टनुसार, लुलिया भारतात आल्यावर सलमान खान याच्यासोत तिच्या भेटी वाढल्या. दरम्यान दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील जोर धरु लागल्या. अफेअरच्या चर्चा रंगत असताना लुलिया हिला सलमान खान याच्यासोबत लग्न करणार का? असा प्रश्न देखील अनेकदा विचारण्यात आला.