Manoj Muntashir on Aurangzeb: गेल्या काही दिवसांपासून देश आणि महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे. अनेक हिंदू संघटनांनी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत बॉलीवूड लेखल मनोज मुंतशीर यानेही मुघल सम्राटाची कबर हटवण्याची मागणी करताना इतिहासावर काही गोष्टी सांगितल्या आहेत. याआधी मनोज याने औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बांधण्याची मागणी केली होती.
आता पुन्हा एक व्हिडीओ पोस्ट करत लेखकाने औरंगजेबाच्या काळ्या कृत्यांवर संताप व्यक्त केला आहे. ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यात औरंगजेबाची कबर नाही पाहिजे, कारण औरंगजेब असा मुलगा होता ज्याने गादीसाठी स्वतःच्या वडिलांना कैद केलं. एवढंच नाही तर, गादीसाठी त्याने स्वतःच्या तीन भावांची हत्या केली.’
पुढे लेखक म्हणाला, ‘काश्मीर येथी तलवारीचा धाक दाखवत हिंदूंना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास बळजबरी केली. काशी आणि मथुरा सारखी महान सनातन मंदिरे पाडण्यात आली. त्याने छत्रपती संभांजी महाराजांचे प्राण घेतले. यासोबतच त्यांनी होळी, दिवाळी या हिंदू सणांवर बंदी घातली होती. ज्याला आपण आईचे स्थान देतो. त्या गायीला मारण्यासाठी त्यांनी मुस्लिमांना मोकळे रान दिलं होतं. ‘
मनोज म्हणाला, ‘माझा श्वास संपतील पण औरंगजेबाची काळी कृत्ये संपणार नाहीत. अशा व्यक्तीला तुम्ही हिरो मानता. या व्यक्तीची कबर तुम्हाला वाचवायची आहे. औरंगजेबाच्या कबरीला पीर म्हणणाऱ्या भारतातील मुस्लिमांना विनंती आहे, तुम्ही कबरीला पीर म्हणत असाल तर आम्हाला भाई म्हणू नका. आता भाऊबंदकी एकाच अटीवर राहील. भारताचा शत्रू तुमचा शत्रू आहे, हे आधी त्याच्या कबरीवर पहिला हतोडा मारून सिद्ध करा…
मनोज मुंतशिर हे अनेकदा आपले विचार खुलेपणाने मांडण्यासाठी ओळखले जातात. आपले मत मांडण्यात तो कधीही मागेपुढे पाहत नाही. ‘औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची गरज नाहीये, तर त्यावर शौचालय बांधा… अशी माझी मागणी आहे. आपण सनातनी आहोत. आपण त्या खुन्याला किमान किमान युरिया आणि मीठ दान करू शकतो.’ असं देखील लेखक सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला.