माधुरी दीक्षितच्या ऑनस्क्रीन मुलीचं 16 वर्षांत इतका बदलला लूक; नेटकरी म्हणाली ‘ही तर दुसरी मोहिनी’

| Updated on: Oct 23, 2023 | 11:26 AM

दलाईने 'आजा नचले'शिवाय अनुष्का शर्माच्या 'फिल्लौरी' या चित्रपटात आणि 'मेड इन हेवन' या सीरिजमध्येही काम केलं होतं. सध्या तिच्या 'इटर्नली कन्फ्युज्ड अँड इगर फॉर लव्ह' या नेटफ्लिक्सवरील नव्या सीरिजची चर्चा होत आहे.

माधुरी दीक्षितच्या ऑनस्क्रीन मुलीचं 16 वर्षांत इतका बदलला लूक; नेटकरी म्हणाली ही तर दुसरी मोहिनी
Madhuri Dixit and Dalai
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 23 ऑक्टोबर 2023 | माधुरी दीक्षितचा ‘आजा नचले’ हा चित्रपट त्यातील गाण्यांमुळे विशेष चर्चेत आला. या चित्रपटाद्वारे माधुरीने बऱ्याच वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन केलं होतं. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या या म्युझिकल ड्रामा चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. मात्र त्यातील गाणी, माधुरीचा डान्स आणि तिचं अभिनय प्रेक्षकांना खूप भावलं. या चित्रपटात दलाईने माधुरीच्या मुलीची भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या फॉरेन एक्सेंटवाल्या हिंदी भाषेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता बऱ्याच वर्षांनंतर दलाई कशी दिसते, हे तुम्हाला दाखवणार आहोत.

चित्रपटात माधुरीची मुलगी राधाची भूमिका साकारणारी दलाई सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. ‘आजा नचले’मधील बालकलाकार आता इतकी बदलली आहे, यावर तुमचाही विश्वास बदलणार नाही. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. गेल्या 16 वर्षांत दलाई पूर्णपणे बदलल्याचं पहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

दलाई ही सुपरमॉडेल रंजीव मूलचंदानी यांची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी तिने ओटीटी विश्वात पदार्पण केलं होतं. एका मुलाखतीत तिने ‘आज नचले’ या चित्रपटाच्या सेटवरील किस्सा सांगितला होता. ती म्हणाली, “मी नेहमी माधुरीजींना त्यांच्या टीमसोबत चालताना पहायची. त्यांचा एक असिस्टंट नेहमी छत्री घेऊन उभा राहायचा. एके दिवशी मी माझ्या आईकडे तशीच छत्री मागितली. तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की माधुरीजींनी त्यांच्या करिअरमध्ये बरेच चित्रपट केले आहेत. त्यांचा हा प्रवास खूप यशस्वी आहे. त्यांची त्वचा चांगली रहावी, मेकअप खराब होऊ नये आणि तीव्र उन्हापासून त्यांच्या चेहऱ्याचा बचाव व्हावा, यासाठी असिस्टंट छत्री घेऊन त्यांच्या आजूबाजूला फिरत असतो. असं सांगितल्यावर आईने मला विचारलं की तुझ्यासाठी छत्री कोण पकडणार? त्यावर मी पटकन म्हणून गेले की, तुम्ही. हे ऐकून आईने मला प्रेमाने गालावर मारलंसुद्धा होतं.”