मुंबई | 07 सप्टेंबर 2023 | महादेव बेटिंग ॲप संबंधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी कसून चौकशी करत आहे. याप्रकरणी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. महादेव बेटिंग ॲप संबंधीत माहिती गोळी करण्यासाठी ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवरर्ल्ड बॉलिवूडच्या प्रॉडक्शन हाऊसला पैसा पुरवत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. शुक्रवारी देखील ईडीने मोठी छापेमारी केली आहे. ईडीने मुंबईतील कुरेशी प्रॉडक्शन हाऊसवर छापेमारी केली आहे. मुंबईत कुरेशी प्रॉडक्शन हाऊसशी सबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. कुरेशी प्रॉडक्शन हाऊस बॉलिवूडमधील मोठं प्रॉडक्शन हाऊस आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमात देखील कुरेशी प्रॉडक्शन हाऊसची महत्वाची भूमिका आहे. ईडीने पाच ठिकाणी छापेमारी केली आहे. अंधेरी येथील अन्य ठिकाणी देखील सध्या छापेमारी सुरु आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी सर्वत्र खळबळ माजली आहे.
महादेव बेटिंग ॲप प्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे देखील समोर आले आहेत. दुबई याठिकाणी झालेल्या एका शाही विवाहसोहळ्यात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. लग्नात तब्बल २०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. हे लग्न सौरभ चंद्राकर याचं होतं. सौरभ छत्तीसगड याठिकाणी राहाणारा आहे.
सौरभ याने मित्र रवी उप्पल याच्यासोबत ‘ महादेव बेटिंग ॲप’ची सुरुवात केली. महादेव बेटिंग ॲप मिळत असलेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीसाठी एक दोन कोटी नाही तर, तब्बल ३५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. पार्टीमध्ये देखील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. आता महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अडकलेल्या सर्व सेलिब्रिटींची ईडीकडून चौकशी होणार आहे.
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अडकलेल्या सर्व सेलिब्रिटींची ईडीकडून चौकशी होणार आहे. रफ्तार, एम्सी दिप्ती साधवानी, सुनील शेट्टी, सोनू सूद, संजय दत्त, हार्डी संधू, सुनिल ग्रोव्हर, सोनाक्षी सिन्हा, रश्मिका मंधाना, सारा अली खान, गुरु रंधावा, टायगर श्रॉफ, कपिल शर्मा, नुसरत बरुचा, मलायका अरोरा, नोरा फतेही, रणबीर कपूर.. यांसारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत.